कराड : लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा निवडून आल्यास चीन अणि रशियासारखी हुकूमशाही आपल्या देशातही येईल. आणि लोकांना  अधिकारच राहणार नाहीत अशी भीती व्यक्त करताना, लोकशाही टिकवण्यासाठी स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई जिंकायचीच असल्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेच्या निमित्ताने कोळे (ता. कराड) येथे जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, मलकापूरच्या नगराध्यक्ष निलम येडगे, नामदेव पाटील, कोळेच्या सरपंच भाग्यश्री देसाई आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा >>> लालबागचा राजा मंडळाकडून राजमुद्रेचा अपमान झाल्याचा आरोप, संभाजीराजे म्हणाले…

केंद्र अणि राज्यासमोर काय प्रश्न आहेत, हे सामान्य जनतेला कळले पाहीजेत म्हणूनच भारत जोडोनंतर  जनसंवाद पदयात्रा काढली आहे. असे सांगून, चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींच्या नऊ वर्षाच्या काळातील कर्जाच्या प्रचंड बोज्यातून  देश वाचणार अशी चिंता व्यक्त केली.

केंद्रातील एकहाती, हुकुमशाही व मनमानी वर्चस्वाला कर्नाटकात दारूण पराभव मिळाला. त्या सत्तेला दक्षिणेतील राज्ये आता साथ देणार नाहीत. हे लक्षात आल्यानंतर भाजपने महाराष्ट्रात कारस्थान करून, शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फोडली. त्यांचे गद्दारीचे राजकारण सामान्य लक्षात आल्याने सामान्य जनता आता त्यांना साथ देणार नाही. स्वतःचा स्वाभिमान  विकून मतदान करणार नाही  असे भावनिक प्रतिपादन चव्हाण यांनी केले.

हेही वाचा >>> संभाजीनगरमधील वाघाच्या बछड्याचं नामकरण, अजित पवारांनी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी उचलताच मुनगंटीवारांनी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खाजगी करणाकडे तब्बल सात हजार शाळांची वाटचाल सुरू आहे. गॅस, तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. नोकर भरती नाही, कर्मचाऱ्यांच्या पगारलाही पैसे नाहीत. ठेकेदारी पध्दतीवर नोकऱ्या दिल्या जात आहेत. मोदींनी  फक्त तेलावर कर लादून तीस लाख कोटी गोळा केल्याची टीका चव्हाण यांनी केली. ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांनी भाजपवर जोरदार टीका करताना, काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेची भूमिका मांडली.