सांगली : बड्यांना माफी आणि शेतकर्‍यांवर जप्ती या जिल्हा बँकेच्या धोरणाविरुद्ध सोमवारी स्वाभिमानी शेतकरी सघटनेच्यावतीने बोंंबाबोंब आंदोलन करण्यात आले. जिल्हा बँकेने हे धोरण बंद करावे अन्यथा, बँकेला टाळे ठोकू असा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी यावेळी दिला.

जिल्ह्यातील खासदार, आमदार कारखानदारांची कर्जे वसूल झालीच पाहिजे, बडयांना माफी शेतकर्‍याची जप्ती चालू देणार नाही अशा घोषणानी बँकेच्या प्रधान कार्यालयासमोरील प्रवेशदारावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलसमोर बोलताना खराडे म्हणाले, जिल्ह्यातील खासदार, आमदार, माजी आमदार आणि पुढार्‍यांची कोट्यवधीची कर्जे थकीत आहेत. जिल्ह्यातील साखर कारखाने आणि सूतगिरण्याची सुमारे १ हजार कोटींची थकीत कर्जे आहेत. अनेक कारखाने, सूतगिरण्या बंद आहेत. त्याच्यावर जप्तीची कारवाई होत नाही त्यांना बँकेचे अधिकारी पायघड्या घालत आहेत. शेतकर्‍यावर मात्र तातडीने जप्तीची कारवाई केली जाते. प्रथम बड्या नेत्याची कर्जे वसूल करा अन्यथा, बँकेला टाळे ठोकू.

हेही वाचा – सांगली : माजी महापौरासह तीन माजी नगरसेवक अजितदादांच्या गटात

हेही वाचा – मोठी बातमी : मराठा सर्वेक्षणावर आता मागासवर्ग आयोगाचा वॉच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोपट मोरे म्हणाले, बँकेची ही हुकूमशाही चालू देणार नाही. या विरोधात आणखी तीव्र आवाज उठवू. यावेळी संजय बेले, राजेंद्र पाटील, अजित हलिगल, भरत चौगुले, बाळासाहेब लिंबीकाई, गुलाब यादव आदीसह शेतकरी उपस्थित होते.