अहिल्यानगर : श्रीरामपूरमधील बेलापूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसला थांबा मिळावा, साई जलदगती रेल्वे रोज सुरू करावी तसेच करोना काळात बंद झालेल्या पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू कराव्यात आदी मागण्यांसाठी सर्वपक्षीयांनी आज, गुरुवारी बेलापूर रेल्वे स्थानकावर निदर्शने केली.रेल्वे स्थानक प्रबंधक एम.पी. पांडे यांना रिपाइंचे सुभाष त्रिभुवन, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, गौतम उपाध्ये, रंजित श्रीगोड, राजेंद्र सोनवणे, मुक्तार शहा संतोष डहाळे, रमाताई धीवर, अमोल साबणे विठ्ठल गोराणे आदींनी निवेदन दिले.

यावेळी बोलताना सुभाष त्रिभुवन म्हणाले, नव्याने सुरू झालेली नागपूर ते पुणे वंदे भारत रेल्वेला बेलापूरमध्ये थांबा नसल्यामुळे श्रीरामपूर-बेलापूर परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या ठिकाणी थांबा दिल्यास प्रवाशांना सुविधा तर मिळेलच, शिवाय रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल. साई सुपरफास्ट पॅसेंजर सध्या आठवड्यात फक्त चारच दिवस चालते. ती दररोज सुरू करावी. या ट्रेनमध्ये कायमच प्रवाशांची गर्दी असते, त्यामुळे ती रोज सुरू झाल्यास प्रवाशांचा त्रास कमी होईल आणि रेल्वेलाही त्याचा आर्थिक फायदा होईल. करोना काळात बंद करण्यात आलेल्या पॅसेंजर गाड्याही तातडीने सुरू कराव्यात, अन्यथा सर्वसामान्य प्रवाशांचे हाल अधिकच वाढतील. त्याचबरोबर मैसूर–वाराणसी एक्स्प्रेस कोपरगावला दीड तास थांबते, पण बेलापूर-श्रीरामपूरला दोन मिनिटांचाही थांबा देत नाही, ही बाब अन्यायकारक आहे. या मागण्यांकडे रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलन तीव्र करू.

ऑनलाइनसाठी जोड

त्यावेळी राजू बत्रा, बन्सीलाल फेरवानी, तेजस गायकवाड, अमोल काळे, संतोष कांबळे, रॉकी लोंढे, योगेश ओझा, भागचंद नवगिरे, लहू खंडागळे, राजेश वाव्हळ, बाळासाहेब ठाकरे, विलास जाधव, अल्ताफ शेख, राहुल शहाणे, रईस शेख, शाहरुख मन्सुरी, मिलिंद धीवर, किशोर फाजगे, बाळासाहेब जपे, बाळासाहेब ढाकणे, किशोर नागरे, दीपक माखिजा, नितीन कापुरे, किशोर गाडे, सागर कुदळे, प्रकाश पाटणी, राहुल नाणेकर, किशोर ऋषिकेश, अरुण, बोराडे, संभाजीराव देवकर, नितीन मासाळ, भाऊसाहेब जाधव, राकेश थोरात, अल्ताफ पोपटिया आदींसह रिपाइं, भाजप, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, व्यापारी संघटना, राष्ट्रीय जनसेवा पक्ष, भारतीय लहुजी सेना संघटना, भिम शक्ती मातंग अस्मिता सेना, बहुजन क्रांती सेना, गुरुनानक मार्केट व्यापारी आदी उपस्थित होते.