Pune Kundmala Bridge Collapse Updates: पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली असून यात अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सदर दुर्घटना घडली असल्याचे समोर आले आहे. एनडीआरएफ, पोलीस यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. सुमारे ३० ते ४० जण नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती वर्तविण्यात येत आहे. रविवारी रात्री उशीरा चार जणांचा मृतदेह आढळून आला.
दोन दिवसांपासून मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून इंद्रायणीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे नदीत पडलेल्या पर्यटकांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न यंत्रणांकडून सुरू आहेत.
VIDEO | Bridge collapses over Indrayani Bridge in Pune. Rescue operation is underway. More details awaited.
— Press Trust of India (@PTI_News) June 15, 2025
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/TnLBCrvvfH
राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत
राज्याचे जलसंपदा तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी कुंडमळा येथील दुर्घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृत्यू पावलेल्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च शासनातर्फे केला जाईल, असेही ते म्हणाले.
सेल्फीच्या नादात जीव धोक्यात घालू नका
पुलावर एकाचवेळी अनेक पर्यटक फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करून जमले होते, असे मंत्री गिरीश महाजन म्हणाले. पर्यटकांनीही आपल्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे. सेल्फीसाठी पर्यटकांनी आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
Pune River Bridge collapse Live Updates | पुण्यातील पूल दुर्घनटेप्रकरणी सर्व अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर
Pune Kundmala Bridge Collapse Live Updates: इंद्रायणी नदीचा वेगवान प्रवाह आणि काळोख असूनही NDRF ची बचाव मोहीम सुरू; ४ जणांचे मृतदेह आढळले
इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनास्थळी युद्धपातळीवर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी घटनास्थळी उपस्थित आहेत. एनडीआरएफचे पथक पाण्याचा वेगवान प्रवाह, काळोख असे अडथळे पार करत बचाव मोहीम राबवत आहेत.
Kundmala : पुण्यातील कुंडमळ्यातील पूल कोसळल्याची घटना कशामुळे घडली? आमदार शेळकेंनी सांगितलं कारण; म्हणाले, "एकाचवेळी पर्यटक…"
Pune Kundmala Bridge Collapse Live Updates: अमित शाहांचा मुख्यमंत्री फडणवीसांना फोन, कुंडमळा दुर्घटनेची माहिती घेतली
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून पुण्यातील कुंडमळा येथील पूल दुर्घटनेची माहिती घेतली. मृतांना श्रद्धांजली वाहत त्यांनी जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना केली.
Pune Kundmala Bridge Collapse Live Updates: ‘सेल्फीच्या नादात जीव गमावू नका’, मंत्री गिरीश महाजन यांचे पर्यटकांना आवाहन
कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळाची पाहणी करत आढावा घेतला. पुलावर एकाचवेळी अनेक पर्यटक फोटो काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करून जमले होते, असे ते म्हणाले. पर्यटकांनीही आपल्या जीवाची काळजी घेणे गरजेचे आहे. सेल्फीसाठी पर्यटकांनी आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
Pune Kundmala Bridge Collapse Live Updates: 'पूल कोसळला तेव्हा मी पुलावरच होतो, माझी गाडी वाहून गेली', प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक प्रसंग
कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत स्थानिक ग्रामस्थ थोडक्यात बचावला. आपल्या दुचाकीसह पलीकडील बाजूस जात असताना हा पूल कोसळला. पूल कोसळल्यानंतर या व्यक्तीची दुचाकी पाण्यात वाहून गेली तर त्याने पडलेल्या पूलाच्या कठड्याला पकडून कसेबसे वरण येण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
Pune Kundmala Bridge Collapse Live Updates: नदीवरील पूल पडला तेव्हा पुलावर १०० हून अधिक लोक उभे होते, स्थानिकांची माहिती
इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पुलावर दुर्घटनेच्या आधी शंभरहून अधिक पर्यटक उभे असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. रविवार असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने आज आले होते. ते पुलाच्या मधोमध उभे होते, असे स्थानिकांनी सांगितले.
कुंडमळा येथील पूल दुर्घटनेत ३० ते ४० पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती एनडीआरएफकडून देण्यात आली आहे. चार बोटींच्या साहाय्याने नदीच्या पुढील भागात शोधमोहिम सुरू असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Pune Kundmala Bridge Collapse Live Updates: कुंडमळ्यात पूल कोसळल्यानंतर काही लोक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले, व्हिडीओ व्हायरल
इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळल्यानंतर काही पर्यटक नदीच्या पाण्यात वाहून जात असल्याचे एका व्हिडीओमध्ये कैद झाले आहे. सोशल मीडियावर या संबंधिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/SupriyaShrinate/status/1934226582006317064
Pune Kundmala Bridge Collapse Live Updates: पावसाळ्या आधी सर्व नदी आणि पुलांची पाहणी करणं गरजेचं - सुषमा अंधारे
इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. कुंडमळा परिसरातील इंद्रायणीवरचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असणारे पूल यांच्या संबंधाने आवश्यक असणारी कामे पावसाळ्याआधी होणे अधिक गरजेचे आहे. अशा मोडकळीस आलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणे गरजेचे आहे. मात्र या पुलाच्या बाबतीत अशी कुठलीही खबरदारी घेतलेली नव्हती, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
Pune Kundmala Bridge Collapse Live Updates: इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेप्रकरणी सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पुल कोसळला. यामुळे पुलावरील काही नागरीक वाहून गेल्याची भीती आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी असून हे सर्व नागरीक सुरक्षित असावे ही ईश्वरचरणी प्रार्थना. या घटनेबाबत जिल्हाधिकारी, पुणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून ते आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहेत. माझी नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया पावसाळी पर्यटनासाठी जाताना कृपया आवश्यक ती काळजी घ्यावी. सुरक्षेच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
Pune River Bridge collapse Live Updates: इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेत ३२ जण जखमी - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आतापर्यंत ६ जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३२ लोक जखमी झाले, त्यापैकी ६ गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.
"पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार २ लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे.
Pune River Bridge collapse Live Updates: कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना
मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटनस्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जूना पूल कोसळून दुर्घटना घडली आहे. रविवार असल्याने पर्यटकांची याठिकाणी गर्दी होती, अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीत बुडाल्याची भीती आहे.
पुण्यातील कुंडमळ्यात पूल कोसळला; २० ते २५ जण बुडाल्याची शक्यता (छायाचित्र - लोकसत्ता ऑनलाईन)