अलिबाग– रायगड जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा तिढा महिन्याभरानंतरही सुटू शकलेला नाही. एकाच पदावर दोन अधिकारी सध्या कार्यरत असल्याने, दोन आधिकार्यांमध्ये संगीत खुर्चीचा खेळ सुरू आहे. रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणुन डॉ. दयानंद सुर्यवंशी यांची अधिकृतपणे नेमुणक झाली आहे. तरी देखील त्यांच्या गैरहजेरीत डॉ. मनिषा विखे आरोग्य अधिकार्यांच्या खुर्चीत बसून काम करतात. त्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचारी हैरण झाले आहेत.
रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून शासनाने डॉ. दयानंद सुर्यवंशी यांची बदली केली. डॉ. सुर्यवंशी हेच रायगड जिल्हा परिषदेचे अधिकृत जिल्हा आरोग्य अधिकारी असल्याचे रायगड जिल्हा परिषदेने जाहीर केले. त्यांनी पदभार स्वीकारून काम सुरू केले. डॉ. मनिषा विखे या रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी होत्या परंतु त्याची ठाणे जिल्हा क्षयरोग अधिकारीपदी बदली झाली आहेत. मात्र या बदली विरोधात त्यांनी मॅट मध्ये दाद मागितली आहे.
महाराष्ट्र एडमिनिस्ट्रेटीव्ह ट्रॅब्युनलने बदलीला स्थगिती दिल्याचा दावा करत त्यांनी पुन्हा रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर दावा संगितला. महिन्याभरापासून जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा तिढा सुटू शकलेला नाही. त्यामुळे एकाच पदावर दोन अधिकारी सध्या कार्यरत असल्याचे चित्र सध्या आरोग्य विभागाला पहायला मिळत आहेत.
डॉ. सुयर्वंशी यांनी पदभार स्विकारल्यानंतर, जिल्हा परिषद प्रशासनाने डॉ. विखे यांचे सह्यांचे अधिकार काढून घेतले, कामकाजाचे सर्व अधिकार डॉ. सुर्यवंशी यांच्याकडे सोपविण्यात आले. मात्र अजूनही डॉ. मनिषा विखे कार्यालयात येऊन आरोग्य विभागाचे कामकाज पाहत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात दोन अधिकाऱ्यामध्ये खुर्चीचा आणि पदाचा वाद रंगताना दिसत आहे. त्यामुळे कर्मचारी हैरण झाले आहेत.
आमदार महेंद्र दळवी यांनी देखील मगळवारी (दि. 22) रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांची भेट घऊन डॉ. मनिषा विखे यांच्या या वर्तणुकीबाबत नाराजी व्यक्त केली.
डॉ. दयानंद सुर्यवंशी हेच रायगड जिल्हा परिषदेचे अधिकृत जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत. डॉ. मनिषा विखे यांचे सह्या करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. डॉ . विखे यांनी मॅटकडे दाद मागितली आहे. याबाबत २५ जुलै रोजी मॅटमध्ये सुनावणी आहे. या सुनावणीत निकाल लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. – नेहा भोसले , मुख्य कार्यकारी अधिकारी , राजिप