अलिबाग– खालापूर कारगाव येथील जंगल परिसरात आढळलेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्या प्रकरणाची उकल करण्यात रायगड पोलीसांना यश आले आहे. तपास कौशल्याच्या जोरावर या संवेदनशील प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहे.

खालापूर तालुक्यातील कारगाव जंगल परिसरात एका अल्पवयीन आठ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. चेहऱ्यावर जखमा असल्याने सुरवातीला एखाद्या हिस्त्र प्राण्याने तिच्यावर हल्ला करण्यात आलाचा संशय व्यक्त केला जात होता. वन विभागाच्या मदतीने या परिसरात हिंस्त्र श्वापदांच्या वास्तव्याच्या खुणा शोधल्या असता तसे कुठलेही पुरावे वनविभाग आणि पोलीसांना आढळून आले नाहीत. याच वेळी जे जे रुग्णालयाने मयत मुलीच्या शवविच्छेदनात तिच्यावर अतिप्रसंग करून तीची हत्त्या केल्याची बाब समोर आली.

हेही वाचा >>> नालासोपारा येथे इमारतीचा स्लॅब कोसळला; ३५ हून अधिक लोक अकडले, बचावकार्य सुरू

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांनी पोलीसांना या गुन्ह्याचा सखोल तपास करण्याचे निर्देश दिले. स्थानिक गुन्हा अन्वेशण विभागासह खालापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी या गुन्ह्याचा तपास करत होती. खोपोली, नेरळ, रसायनी येथील पथकेही तपासासाठी पुढे आली. निरनिराळी पथके करून पोलीसांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली. घटनास्थळ जंगल परिसरात असल्याने या ठिकाणी सिसिटीव्ही कॅमेरे इतर तांत्रिक पुरावे उपलब्ध होऊ शकत नव्हती. त्यामुळे तपास अवघड होता.

ज्या दिवशी ही हत्या झाली होती. त्याच दिवशी त्या लगतच्या परीसरात क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे अनेक संघ उपस्थित होते. त्यांच्याकडून क्रिकेट संघातील खेळाडू, प्रेक्षक, गावकरी यांच्याकडून माहिती संकलित करणे कठीण होते. त्यामुळे बऱ्याच संशयितांना ताब्यात घेऊन पोलीसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली.

हेही वाचा >>> “तुनिषा शर्मा मृत्यू प्रकरणात लव्ह जिहादचा अँगल असेल तर…” भाजपा आमदार राम कदम आक्रमक

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप-निरीक्षक  महेश कदम त्यांचे पथकाने यातील मयत हिस जंगलाचे दिशेने जाताना पाहणा-या शेवटच्या इसमाकडे पुन्हा चौकशी केली. त्यावेळी चौकशी दरम्यान तो घाबरलेला आढळून आला. प्रत्येक चौकशीचे वेळी वेगवेगळी माहीती देवू लागला होता. त्यामुळे पोलीसांचा त्याच्यावर संशय बळावला. पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल व कौशल्यपुर्ण पद्धतीने तपास केला असता आरोपीत याने गुन्ह्याची कबुली दिली.

मयत मुलगी ही एकटीच जंगलभागाकडे येत असल्याचे पाहून त्याने तीचा पाठलाग केला. तिच्यावर जंगलात नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. घरी नाव सांगेल म्हणून तीचा गळा दाबून नंतर डोक्यात दगड टाकून ठार मारल्याचे त्यांनी सांगीतले.

या कबूलीनंतर आरोपी अजय विजय चव्हाण, रा. कारगाव, ता.खालापूर यास पोलीसांनी अटक केली असून त्यायालयाने त्याला ३० डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्याच्या तपासात उपविभागीय पोलीस अधिकारी, खालापूर, श्री.संजय शुक्ला,उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा किरण सुर्यवंशी, तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्यासह पोलीस निरीक्षक खालापूर बाळा कुंभार, पोलीस निरीक्षक खोपोली शिरीष पवार, पोलीस निरीक्षक रसायनी अश्वनाथ खेडकर, पोलीस निरीक्षक पाली विश्वजीत काईंगडे, पोलीस निरीक्षक नेरळ तेडुलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड, बालवडकर, अजित साबळे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती बोराटे, पोलीस उप निरीक्षक प्रदिप आरोटे, महिला पोलीस उप-निरीक्षक सरला काळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप-निरीक्षक महेश कदम यांच्या पथकांनी महत्वाची भूमिका बजावली….

गुन्ह्याचा तपास खूपच आव्हानात्मक होता. तांत्रिक पुरावे उपलब्ध नव्हते मात्र एकाच वेळी वेगवेगळ्या पोलीसांची पथके नेमून या गुन्ह्याचा तपास सुरु करण्यात आला होता. पोलीसांनी तपास कौशल्य वापरून गुन्ह्याची उकल केली आणि आरोपीला जेरबंद केले आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही न्यायालयात प्रयत्न करणार आहोत. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, रायगड