सांगली : जोरदार वार्‍यासह गुरूवारी सायंकाळी सांगलीत रोहिणीच्या पावसाने धुमाकूळ घातला. पावसाने महापालिकेच्या नालेसफाई कामाचा पंचनामा करीत वाहन चालकांची तारांबळ उडवली. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे वीज वाहक तारा तुटल्या, खांब वाकले तर रस्त्यावर पाण्याची तलाव झाले. मात्र, जिल्ह्यातील तासगाव, कवठेमहांकाळ, मिरज भागात हलका पाउस झाला. दिवसभराच्या उकाड्यानंतर झालेल्या पावसाने हवेत सुखद गारवा निर्माण झाला आहे.

गेल्या चार दिवसापासून पावसाचे वातावरण तयार होते, मात्र, पावसाची हजेरी खंडित स्वरूपात होत आहे. गुरूवारीही दिवसभर हवेतील तपमान ३९ अंशावर पोहचले असले तरी आकाशात दिवसभर ढगांचा राबता दिसत होता. सायंकाळी चार वाजलेनंतर जोरदार वारे आणि ढगांचा गडगडाट यासह दमदार पावसाने सांगली, विश्रामबाग, मिरज, कुपवाड परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. पंधरा मिनीटाच्या दमदार पर्जन्यवृष्टीनंतर रिमझिम पाउस अर्धा तास सुरू होता. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. गणपती पेठ, कापड पेठ हरभट रोडवर पदपथ विक्रेत्यांची स्थिती गंभीर झाली होती.

Mumbaikars should have a referendum on Mahalakshmi Race Course proposal ex-BJP corporators demand
महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावावर मुंबईकरांचे सार्वमत घ्यावे, भाजपच्या माजी नगरसेवकांची मागणी
Clash of women in two villages over Ichalkaranji tap water scheme
इचलकरंजी नळपाणी योजनेवरून दोन गावातील महिलांचा असाही संघर्ष; ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ नंतर ‘आम्ही जिजाऊच्या लेकीं’चे सोमवारपासून प्रतिआंदोलन
Bullet, Army Firing, Practice, Hits Kothrud Residence, bhusari colony, pune,
पुणे : लष्करी सरावादरम्यान कोथरुडमध्ये सदनिकेच्या खिडकीवर बंदुकीची गोळी
pune, wall of old wada, collapsed, budhwar peth, Firefighters, Save, 2 persons,lives,
पुणे : बुधवार पेठेत जुन्या वाड्याची भिंत कोसळली; अग्निशमन दलाच्या जवानांमुळे दोघांचे प्राण वाचले

अचानक आलेल्या पावसाने दुचाकीस्वारांची पावसाचा मारा चुकवण्यासाठी रस्त्यावरील इमारत, दुकाने, झाडे यांचा आडोसा घेतला होता. सांगली-मिरज रस्त्यावर लावण्यात आलेले डिजीटल फलक जोरदार वार्‍याने फाटले. तासगाव, विटा परिसरातही हलका पाउस झाला. मात्र वार्‍याचा जोर जास्त होता.