पुत्र प्रतिक पाटील यांच्याकडे राजारामबापू कारखान्याची सूत्रे सोपवत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आज सहकारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राजारामबापू सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाची आज अविरोध निवड झाली असून, अधिकृत घोषणा २१ फेब्रुवारीला होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजारामबापू सहकारी संचालक मंडळ निवडीची प्रक्रिया सुरू असून, आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत दाखल ३८ उमेदवारांपैकी १७ जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामुळे ही निवडणूक अविरोध झाली असून औपचारिक घोषणा निर्धारित मुदतीनंतर होणार आहे.

हेही वाचा – हिंदू महासंघ संघटनेचे आनंद दवे कसबा पोटनिवडणूक लढणार, शैलेश टिळक यांची घेतली भेट

हेही वाचा – “आपण बाळासाहेबांच्या कॉंग्रेसचे काम करायचे, की नानांच्या कॉंग्रेसचे?”, काँग्रेस प्रवक्त्याचं ट्वीट चर्चेत

नवीन संचालक मंडळामध्ये आ. पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांच्यासोबत दीपक पाटील, शैलेश पाटील, अतुल पाटील, अमरसिंह साळुंखे, बबन थोटे, रघुनाथ जाधव, योजना पाटील, आप्पासाहेब हाके, हणमंत माळी आणि राजकुमार कांबळे या नव्या चेहर्‍यांना संचालकपदाची संधी देण्यात आली आहे. तर, प्रदीपकुमार पाटील, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, कार्तिक पाटील, विठ्ठल पाटील, दादासाहेब मोरे व मेधा पाटील या जुन्या संचालकांना संधी देण्यात आली आहे. कारखान्याच्या साखराळे, वाटेगाव सुरूल, कारंदवाडी आणि तिपेहळळी जत या चार शाखा असून कारखान्याची सभासद संख्या बारा हजार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajarambapu factory election unopposed in sangli ssb
First published on: 06-02-2023 at 18:14 IST