शिवसेनेने भाजपसोबत युती करुन सरकार स्थापन करावं, अजूनही वेळ गेली नाही, अशी इच्छा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. रामदास आठवले अमरावतीत बोलत होते. तसेच आठवले यांनी शिवसेनेचं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काय होणार यावर भाकित केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

महाविकास आघडीच्या सरकारमध्ये सातत्याने भांडण असतात. त्यामुळे हे सरकार कीती वर्ष टीकेल हे काही सांगता येत नाही. यांना एकत्र राहायचं असेल तर यांनी एकमेकांमध्ये कोपरखळ्या मारण्याचं थांबवल पाहीजे, असे आठवले म्हणाले. तसेच शिवसेनेला बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न साकारायचं असेल आणि आपले मतदार जपायचे असतील तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा नाकारावा, तेव्हाच शिवसेना टिकेल. नाहीतर शिवसेनेचं २०२४ मध्ये खूप मोठं नुकसान होईल, असे देखील रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर देखील टीका केली. वंचितांकडून मत खाण्याचं राजकारण होत आहे. युती केल्याशिवाय कठीण आहे, अस यावेळी रामदास आठवले म्हणाले.