देशातले विविध राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या जागांची चाचपणी करत आहे. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष याबाबत चर्चा करू लागले आहेत. अशातच महायुतीतले पक्षही निवडणुकीची तयारी करू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पार्टीने लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या १५ जागा महायुतीत मागू अशी घोषणा केली आहे. त्यानंतर आता महायुतीतला आणखी एक पक्ष म्हणजे रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियादेखील निवडणुकीच्या कामाला लागली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, त्यांचा पक्ष आगामी काळात लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढणार आहे. यावेळी आठवले यांनी दोन मोठ्या मागण्या मांडल्या. या मागण्या ते भाजपा-शिवसेनेसह महायुतीसमोर मांडतील असंही ते म्हणाले.

हे ही वाचा >> “हे खोटं आहे”, ओडिशा अपघाताबाबत काँग्रेसचा ‘तो’ दावा IRCTCनं खोडून काढला, आकडेवारी केली सादर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामदास आठवले म्हणाले, आरपीआयला निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवायची आहे. तसेच स्वतःचं चिन्ह हवं आहे. यासाठी आमच्या दोन जागा तरी निवडून आल्या पाहिजेत. त्यामुळे मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलून आरपीआयला लोकसभेच्या दोन ते तीन जागा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच संपूर्ण राज्यात विधानसभेला १० ते १५ जागा मिळाव्यात असा आमचा प्रयत्न राहील.