माजी मंत्री रामदास कदम यांचे सुपुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी (६ जानेवारी) रात्री भीषण अपघात झाला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ कशेडी घाटात हा अपघात घडला. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. योगेश कदम यांचा अपघात घडवून त्यांना गाडीसह दरीत ढकलण्याचा कट होता, असा गौप्यस्फोट रामदास कदम यांनी केला. अपघातानंतर योगेश कदमांची गाडी सुदैवाने पोलिसांच्या गाडीला धडकली. यामुळे हा कट फसला, अशा आशयाचं विधान कदम यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

हेही वाचा- हसन मुश्रीफांच्या घरी ईडीकडून छापेमारी; राष्ट्रवादी काँग्रेसचे भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले…

यावेळी रामदास कदम म्हणाले, “योगेश कदम अपघातप्रकरणी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. चालकालाही अटक केली आहे. त्याने जबाब दिला होता की, ब्रेक फेल झाला होता. पण जेव्हा वाहनाची तपासणी केली तेव्हा ब्रेक फेल झाला नव्हता, असं समोर आलं. चालक खोटं बोलतोय. पुढे आणि मागे पोलिसांच्या गाड्या असताना त्या डंपरने योगेश कदमांच्या मधल्या गाडीला दीडशे फुटापर्यंत लांब रेटत नेलं. ती गाडी आणखी थोडं पुढं गेली असती तर दरीत कोसळली असती. असाच तो प्लॅन होता, असं मला वाटतं. योगेश कदमांची गाडी पुढच्या पोलिसांच्या गाडीली धडकली नसती तर त्याची गाडी खोल दरीत कोसळली असती,” असंही रामदास कदम म्हणाले.

हेही वाचा- शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात, मुंबई-गोवा महामार्गावर डंपरची धडक

“आमचं नशीब चांगलं होतं. लोकांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते. त्यामुळे माझा मुलगा बचवला. मात्र, तो चालक खोटं बोलतोय, हे सिद्ध झालं आहे. आता पोलिसांनी दोन ठिकाणी दोन तपास पथकं पाठवली आहेत. चालकाचं आतापर्यंतचं सर्व रेकॉर्ड तपासण्याचं काम सुरू आहे,” अशी माहिती रामदास कदम यांनी दिली.