माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याचे शनिवारी जाहीर केले. हा निर्णय जाहीर करताना त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून ‘परिस्थतीनुरूप निर्णय घेत आहे’ असे सांगितल्याचेही खोतकर यांनी या वेळी सांगितले होते. सुरक्षित राहण्यासाठीच शिंदेंना पाठिंबा दिल्याची कबुली खोतकर यांनी दिली. यांच्या या कबुलीनंतर खोतकर यांचे राजकीय विरोधक केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी ईडीच्या त्रासामुळे आलो किंवा माझ्या कुटुंबाला त्रास होता, असे न सांगता त्यांनी आगामी राजकीय व्यवस्था करण्यासाठी मी चाललो आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी यापुढे द्यावे. त्यांनी विधानसभा लढवावी. मी लोकसभा लढवेन, असा सल्ला दानवे यांनी खोतकरांना दिला आहे.

हेही वाचा >>> ईडी कार्यालयात जाताना संजय राऊत अचानक मागे आले आणि म्हणाले, “पेढे वाटा…”

“अर्जुन खोतकर यांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी शिवसेनेची साथ का सोडली, ते शिंदेसेनेत का आले याचे उत्तर तेच देऊ शकतात. आम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिलेला नसून आमचे नाव वापरू नये. ईडी आमच्यामुळे नव्हे तर कदाचित त्यांच्या गोष्टी उघड्या पडल्या असतील म्हणून आली असेल. मी ईडीच्या त्रासामुळे आलो किंवा माझ्या कुटुंबाला त्रास होता, असे न सांगता त्यांनी आगामी राजकीय व्यवस्था करण्यासाठी मी चाललो आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी यापुढे द्यावे,” असे दानवे म्हणाले.

हेही वाचा >>> ९ तासांच्या छापेमारीत ईडीने काय केले? संजय राऊतांचे बंधू सुनिल राऊतांनी नेमके सांगितले, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एकनाथ शिंदे यांच्यासमोर आमचे राजकीय मतभेत मिटलेले आहेत. पुढील काळात हे मतभेत पुन्हा निर्माण होणार नाहीत, याची आम्ही काळजी घेऊ. अर्जुन खोतकर यांचे क्षेत्र वेगळे आहे. माक्षे क्षेत्र वेगळे आहे. त्यांनी विधानसभेवर दावा सांगावा. मी लोकसभेवर दावा सांगेन. माझा पक्ष जो निर्णय घेईन तो मी मान्य करेन. पण त्यांच्या क्षेत्रात त्यांनी काम करावे. मी त्यांना मदत करेन. पक्षात येणे किंवा जाणे हे नेत्याच्या स्थानिक परिस्थितीवर अवलंबून असते. भारतीय जनता पक्ष स्वत:ला वाढवण्यााच प्रयत्न करतो. कोणालाही कमी लेखण्याचे आमचे काम नाही,” असेदेखील दानवे यांनी सांगितले