महाविकास आघाडीमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी स्वपक्षाविरोधात पुकारलेल्या बंडाला आज एक आठवडा पूर्ण होत असून दिवसोंदिवस हा सत्तासंघर्ष चिघळत चालल्याचं चित्र दिसत आहे. त्यातच या सत्तासंघर्षामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच संपूर्ण ठाकरे कुटुंब चर्चेत आहेत. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांची सुरक्षाही वाढवण्यात आलीय. अशाचत आता शिवसेनेच्या नेत्या आणि माजी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासंदर्बात एक मोठा दावा केला आहे.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचा मोठा निर्णय; आता…

किशोरी पेडणेकर यांनी रविवारी प्रसारमाध्यमांसमोर कलेल्या दाव्यामध्ये अनेक बंडखोर आमदारांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या संपर्कात आहेत. बंडखोर आमदारांच्या पत्नींचे रश्मी ठाकरेंना फोन येत असल्याचं पेडणेकर यांच्याकडून सांगण्यात आलंय. रश्मी यांच्याकडे या बंडखोर आमदारांच्या पत्नींनी आपल्या पतीला पुन्हा राज्यात घेऊन येण्यासंदर्भात मदत करावी अशी मागणी केल्याचा दावा पेडणेकर यांनी केलाय.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंचा थेट राज ठाकरेंना फोन; ‘या’ विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा

पेडणेकर यांचा विरोधी दावा
कालच रश्मी ठाकरे आता बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधून त्यांचे मन वळवत असल्याची बातमी समोर आली होती. त्याच्या अगदी विरोधी दावा करणारं वक्तव्य आता पेडणेकर यांनी केलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बंडखोरांचे मन वळवण्यात अपयशी ठरले आहेत. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, या राजकीय लढतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आघाडी घेत शिवसेनेविरोधात बंडखोरी करणाऱ्या आमदारांच्या पत्नींना स्वत: फोन लावला. रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करून त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे.

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: “गुवाहाटीला जाऊन मला…”; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबद्दल बोलताना शरद पवारांचं वक्तव्य

रश्मी ठाकरे काय म्हणाल्या?
रश्मी ठाकरे यांनी बंडखोर आमदारांच्या पत्नींशी संपर्क साधत त्यांना आमदारांसोबत बोलण्यासाठी वळविण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, आमदारांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेही सक्रिय झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी काही बंडखोर आमदारांशीही मेसेजद्वारे संवाद साधला आहे. तर काही बंडखोर आमदार शिवसेनेसोबत असल्याचे सांगत आहेत. तसेच बंडखोर आमदारांकडूनही शिवसेनेसोबत असल्याची वक्तव्ये सातत्याने येत आहेत. त्यामुळे शिंदे गटात संभ्रम निर्माण झाला आहे.

नक्की पाहा >> Photos: केंद्रीय मंत्रिमंडळात मुलाला स्थान, RSS चा प्रभाव, खासदारकी अन्…; एकनाथ शिंदेंचं बंड पुत्रप्रेमातून असण्यामागील कारणं

२१ जूनपासून राजकीय नाट्य सुरू

महाराष्ट्रातील हा राजकीय गोंधळ २१ जूनच्या सकाळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि काही आमदारांसह महाराष्ट्र सरकारच्या विरोधात बंड करत सुरतला गेले तेव्हा सुरू झाला. नंतर एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला गेले. हे बंडखोर आमदार विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालापासून नॉट रिचेबल होते. ते सध्या गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत. त्यानंतर अपक्षांसह अनेक आमदार बंडखोर छावणीत दाखल झाले आहेत.

नक्की वाचा >> ‘…असा आव आणू नका, याची किंमत भविष्यात भाजपाला चुकवावीच लागेल’; बंडखोर आमदारांना ‘नाच्या’ म्हणत शिवसेनेचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदारांनी राजीनामे दिल्यास पडणार महाविकास आघाडी सरकार
महाराष्ट्र विधानसभेचे एकूण संख्याबळ २८८ आहे आणि विश्वासदर्शक ठराव झाल्यास बहुमत १४४ आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीला १६९ जागा मिळाल्या आहेत. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांनी राजीनामा दिल्यास, महाविकास आघाडीचे संख्याबळ बहुमताच्या खाली जाईल, ज्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडेल.