राज्यात करोनाच्या संकटामुळे नागरिक त्रस्त असताना लॉकडाउनच्या निर्बंधांमुळे अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पदांची भरती प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये क आणि ड वर्गातील एकूण १२ हजार पदं, ब वर्गातील २ हजार पदं आणि २ हजार विशेषज्ञांचा समावेश असणार आहे. येत्या आठवड्याभरात यासंदर्भातली शासन पातळीवरची निर्णय प्रक्रिया पार पाडली जाईल आणि त्यानुसार भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे एकीकडे करोनामुळे बेरोजगारी किंवा आर्थिक अडचणीचा सामना सुरू असताना हा काही प्रमाणात दिलासा मानला जात आहे.

आता मंत्रिमंडळाच्या परवानगीची आवश्यकता नाही!

दरम्यान, यासंदर्भात पुढील निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. “मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही सांगितलं की रुग्णसेवेशी संबंधित पदांची १०० टक्के भरती करण्याची आवश्यकता आहे. कॅबिनेटने ठरवलं आहे की आता आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावर हा निर्णय येत्या २ ते ३ दिवसांत घेतला जाईल. तसेच. तातडीने परीक्षा घ्याव्यात असं देखील ठरवण्या आलं आहे”, असं टोपे म्हणाले.

कशी असेल भरती प्रक्रिया?

कोणत्या वर्गासाठी किती जागांची भरती केली जाईल, याची देखील माहिती राजेश टोपे यांनी दिली. “१२ हजार क आणि ड वर्गातील जागा, २ हजार ब वर्गातील डॉक्टर-मेडिकल ऑफिसर आणि २ हजार स्पेशालिस्ट यांच्या जागा भरण्याचा निर्णय आपण घेत आहोत. त्याची शासन स्तरावरील कारवाई आठवड्याभरात पूर्ण होईल. त्यानंतर क आणि ड वर्गासाठी एजन्सीच्या माध्यमातून परीक्षा घेतली जाईल. आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांच्या माध्यमातून ब वर्गाच्या मुलाखती घेतल्या जातील. तर अ वर्गासाठीचे सिलेक्शन एमपीएससीकडे पाठवले जातील”, असं टोपे यावेळी म्हणाले.

फायझर-बायोएनटेक लसीचा शुक्राणूंवर कोणताही परिणाम नाही!

करोनाची तिसरी लाट…!

देशात करोनाची तिसरी लाट अटळ असल्याचा इशारा नुकताच केंद्र सरकारच्या विज्ञानविषयक सल्लागारांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, रेमडेसिविर अशा सर्वच कमतरता असणाऱ्या गोष्टींवर काम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. मात्र, त्यासोबतच तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य सेवेतील कर्मचारी, तज्ज्ञ आणि डॉक्टर-नर्सदेखील पुरेशा संख्येत असणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील वाढत्या करोनाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून तातडीने आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत असल्यामुळे करोनाचा अधिक सक्षमपणे सामना करता येईल असं सांगितलं जात आहे.

मद्रास हायकोर्टाची निवडणूक आयोगावर केलेली टीका कठोर आणि अयोग्य : सर्वोच्च न्यायालय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी दिवसभरात ५७ हजार ६४० नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत करोनाची लागण झालेल्या नागरिकांची संख्या ४८ लाख ८० हजार ५४२ इतकी झाली आहे. यापैकी ६ लाख ४१ हजार ५९६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दुसरीकडे राज्यात दिवसभरात तब्बल ९२० करोनाबाधितांचा मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे राज्यातल्या एकूण मृतांचा आकडा ७२ हजार ६६२ इतका झाला आहे. त्यासोबत राज्याचा मृत्यूदर १.४९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.