‘खरीप सन २०१५-१६ पणन हंगाम आधारभूत किंमत योजना’ लागू करण्यात आलेली आहे. त्यामध्ये धान, भात (एफएक्यू) साधारणसाठी १४१० रुपये प्रति िक्वटल तर अ दर्जासाठी १४५० रुपये प्रति िक्वटल अशी आधारभूत किंमत निच्छित करण्यात आली आहे. भरड धान्य (एफएक्यू) ज्वारी(संकरित)साठी आधारभूत किंमत १५९० रुपये प्रतिक्विंटल तर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर १५७० रुपये प्रतिक्विंटल असेल. ज्वारी(मालदांडी)साठी आधारभूत किंमत १५९० रुपये प्रतिक्विंटल, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर १५९० रुपये प्रतिक्विंटल असेल. बाजरीसाठी आधारभूत किंमत १२७५ रुपये प्रतिक्विंटल तर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर १२७५ रुपये प्रतिक्विंटल असेल. मका धान्यासाठी आधारभूत किंमत १३२५ रुपये प्रतिक्विंटल तर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर १३२५ रुपये प्रतिक्विंटल असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दर्शविण्यात आलेल्या दरापेक्षा कमी दराने (आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने) व्यापाऱ्यांकडून धानाची खरेदी होत असेल, शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसेल, व्यापारी योग्य भाव देत नसेल तर संबंधित व्यापाऱ्याविरुद्ध तक्रार संबंधित कार्यक्षेत्राच्या बाजार समितीकडे करण्यात यावी व याबाबतीत अनुज्ञप्तीधारक व्यापाऱ्यांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची राहणार आहे.काही तक्रार असल्यास रायगड जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, अलिबाग (०२१४१)२२४७७३, कृषी उत्पन्न बाजार समिती, पेण (०२१४३)२२२०६८, कृषी उत्पन्न बाजार समिती, पनवेल (०२२)२७४५२३७१, कृषी उत्पन्न बाजार समिती, कर्जत (०२१४८)२२२०९६, कृषी उत्पन्न बाजार समिती, खालापूर (०२१९२)२७५०५५, कृषी उत्पन्न बाजार समिती, रोहा (०२१९४)२३२२५५, कृषी उत्पन्न बाजार समिती, मुरूड (०२१४४) २७६०५९, कृषी उत्पन्न बाजार समिती, माणगाव (०२१४०)२६३०६३, कृषी उत्पन्न बाजार समिती, महाड (०२१४५)२२२२६ येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, रायगड यांनी केले आहे

More Stories onतांदूळRice
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rice get support price of rs 14100 per kwintal
First published on: 22-01-2016 at 03:03 IST