परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र पुन्हा एक नंबरला आल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केलं होतं. याला आता राष्ट्रवादीचं आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “आमचं सरकार आलं आणि महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आल्याच्या बाता मारणं, हा पूर्णत: बालीशपणा आहे. परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्रात आधीपासून एक नंबर होता आणि आजही आहे,” असं रोहित पवारांनी सांगितलं आहे.

ट्वीट करत रोहित पवार म्हणाले की, “फेकाफेकी आणि रेटून खोटं बोलायचं हा भाजपाच्या नेत्यांचा स्थायीभाव आणि मूळ स्वभाव आहे. त्यातही स्वतःची खोटी पाठ थोपटवून घेण्यात भाजप नेत्यांचा हात कुणीही धरू शकणार नाही. नुकतीच केंद्र सरकारने परकीय गुंतवणूकीसंदर्भातील आकडेवारी जाहीर केली, यावरुनही हेच दिसतंय.”

Prime Minister Narendra Modi slams congress over development
‘मोदींची गॅरंटी’ म्हणजे क्षणाक्षणाची मेहनत! वर्ध्यात नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Rohit Pawar reacts on crab case says I will not stop until I crush corrupt people
“भ्रष्टाचारी खेकड्याची नांगी ठेचणारच…”, खेकडा प्रकरणावर रोहित पवार यांचे भाष्य
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”

हेही वाचा : शरद पवारांना आलेल्या धमकीवर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “सौरभ पिंपळकरचा मास्टरमाईंड…”

“महाराष्ट्र पहिल्यांदा तिसऱ्या नंबरला घसरला होता”

“आमचं सरकार आलं आणि महाराष्ट्र पुन्हा पहिल्या क्रमांकावर आल्याच्या बाता मारणं, हा पूर्णतः बालीशपणा आहे. मुळात परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र आधीपासूनच एक नंबर होता आणि आजही आहे. उलट भाजपा सरकारच्या काळात २०१९ पूर्वी महाराष्ट्र पहिल्यांदा तिसऱ्या नंबरला घसरला होता; परंतु मविआ सरकार येताच पहिल्या सहा महिन्यातच राज्य पुन्हा पहिल्या नंबरवर आले,” असे रोहित पवारांनी सांगितलं.

“हे सरकार आल्यापासून मोठमोठे अनेक उद्योग राज्यातून…”

“आताच्या सरकारचा तर परकीय गुंतवणूक, उद्योग याबद्दल काडीचाही संबंध नाही. हे सरकार आल्यापासून मोठमोठे अनेक उद्योग राज्यातून बाहेर गेले आणि थेट परकीय गुंतवणूकही मंदावली. माविआ सरकारच्या काळात एप्रिल-जून २०२२ या पहिल्या तिमाहीत ४० हजार ३८६ कोटींची गुंतवणूक आली तर भाजपा सरकारच्या काळात जुलै-सप्टेबर २०२३ या दुसऱ्या तिमाहीत २२ हजार ३९ कोटी, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ मध्ये २२ हजार ७६१ कोटी तर जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत ३२ हजार ८१४ कोटींची गुंतवणूक आली,” अशी माहिती रोहित पवारांनी दिली.

“माविआ सरकार असताना ४३ हजार १०६ कोटींची गुंतवणूक”

“जानेवारी ते मार्च २०२२, एप्रिल ते जून २०२२ या दोन्ही तिमाहीत मविआ सरकारने सलगपणे ४० हजार कोटींच्या परकीय गुंतवणूकीचा आकडा पार केला. जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत आलेली ३२ हजार ८१४ कोटीची गुंतवणूक ही या सरकारची सर्वोच्च कामगिरी आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत (जानेवारी ते मार्च २०२२) मध्ये माविआ सरकार असताना ४३ हजार १०६ कोटींची गुंतवणूक आली होती,” असेही रोहित पवारांनी सांगितलं.

“महिन्याला केवळ ८ हजार ६२३ कोटींची परकीय गुंतवणूक”

“जुलै २०२२ ते मार्च २०२३ या नऊ महिन्यात भाजपा सरकारने ७७ हजार ६१४ कोटींची गुंतवणूक आणली, तर गेल्या वर्षी मविआ सरकारने याच कालावधीत ८४ हजार ८२३ कोटींची गुंतवणूक आणली होती. मविआ सरकारच्या काळात दर महिन्याला ९ हजार ४२४ कोटींची थेट परकीय गुंतवणूक येत होती. तर सध्याच्या सरकारच्या काळात दर महिन्याला केवळ ८ हजार ६२३ कोटींची परकीय गुंतवणूक आलेली आहे,” असं रोहित पवारांनी म्हटलं.

“सर्व उद्योगांनी गुजरात, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांना…”

“मविआ सरकारच्या शेवटच्या सहा महिन्यात दर महिन्याला १३ हजार ९१५ कोटींची परकीय गुंतवणूक आली. तर, सध्याच्या सरकारच्या शेवटच्या सहा महिन्यात दर महिन्याला ९ हजार २६२ कोटींची गुंतवणूक आली. महाराष्ट्र हे आधीपासूनच उद्योग क्षेत्राला आकर्षित करणारं आणि नेहमीच परकीय गुंतवणूकीतच्या बाबतीत आघाडीवर राहिलेले राज्य आहे. सेमीकंडक्टर, ई व्हेईकल, विमाननिर्मिती, डिफेन्स संबंधित मोठी गुंतवणूक देशात आली. परंतु, यापैकी एकही उद्योग महाराष्ट्रात आलेला नाही. सर्व उद्योगांनी गुजरात, तमिळनाडू, तेलंगणा या राज्यांना पसंती दिल्याचे दिसते,” असे रोहित पवार म्हणाले.

हेही वाचा : निलेश राणेंची शरद पवारांवर खालच्या पातळीवर टीका; अजित पवार म्हणाले…

“…तर महाराष्ट्र कधी विसरणार नाही”

“इतर राज्यांच्या सरकारांनी मोठे प्रयत्न करून गुंतवणूक आणली आणि आपलं सरकार मात्र केवळ स्थागित्या देण्यात, राजकीय कारवाया करण्यात आणि बाता मारण्यात व्यस्त राहिलं. आपलं हे अपयश लपवण्यासाठी मूळ मुद्द्यापासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी राज्यात जाणीवपूर्वक धार्मिक–जातीय द्वेषाची पेरणी करुन राजकीय फायद्याचं पीक घेण्याचं काम या सरकारकडून होत असेल, तर महाराष्ट्र कधी विसरणार नाही आणि त्यांचे हे मनसुबेही इथली सुजाण जनता कधी पूर्णही होऊ देणार नाही, हे नक्की,” असेही रोहित पवारांनी सांगितलं.