बाळासाहेब ठाकरेंचं शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळ हा तमाम शिवसेना कार्यकर्त्यांसाठी भावनिक विषय आहे. पण या स्मृतीस्थळामुळे आपली अडचण होत असल्याची तक्रारवजा विनंती करणारं पत्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मुंबई महानगर पालिकेला लिहिलं आहे. २६ ऑक्टोबर २०२१ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पाठवलेलं हे पत्र आता समोर आलं आहे. या पत्रामध्ये शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळामुळे संघाच्या शाखेला अडचण होत असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे. तसेच, त्यासंदर्भात पत्रातून वेगळी मागणी देखील करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९३६ पासून भरते संघाची शाखा!

शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मतीस्थळाला लागूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेसाठीची जागा आहे. संघाच्या दादरमधील विभागामार्फत पालिकेला पाठवलेल्या पत्रानुसार, १९३६ सालापासून संघाची शिवाजी पार्कवर शाखा भरते. १९६७ मध्ये पालिकेनं तिथला १७५५ चौरस मीटरचा भूखंड संघाच्या शाखेसाठी भाडेपट्टीवर दिला. २००७ पर्यंत या भूखंडाचं भाडं देखील शाखेमार्फत भरण्यात आलं. मात्र, २००७ पासून आत्तापर्यंत पालिककडे वारंवार मागणी करून देखील या भूभागाचं आरेखन करण्यात न आल्यामुळे त्याचं भाडं थकित असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rss dadar branch writes bmc balasaheb thackeray memorial land issue pmw
First published on: 13-04-2022 at 12:32 IST