“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता नेतृत्त्वबदल करायचा आहे, अशी बातमी आहे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या पुण्यातील एका सभेत बोलत होत्या. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. परंतु, या चर्चा पोकळ असल्याचं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय.

“एका कार्यकर्त्याने मला माहिती दिली आहे की आरएसएसने निर्णय घेतला आहे. त्यांना नेतृत्त्वबदल हवा आहे. या माहितीबाबत खरंखोटं मला माहीत नाही. तुम्ही नेतृत्त्वबदल करा नाहीतर नका करू. पण प्रशासनाला बसा. नाहीतर झेपत नसेल तर हम तो तय्यार है. आज देशात जे चित्र झालं आहे आपल्यासाठी फार आशादायी आहे”, असं सुप्रिया सुळे पुण्याच्या सभेत म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंचं हे वक्तव्य येताच अनेकांच्या भूवया उंचावल्या. काही दिवसांपूर्वी जे. पे. नड्डांचं एक वक्तव्यही असंच गाजलं होतं. भाजपाला आता आरएसएसची गरज नाही, असा त्यांच्या बोलण्याचा सूर होता. यावरून अनेकांनी स्पष्टीकरणही दिलं. त्यात आता सुप्रिया सुळेंनी हे विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावरून शंभूराज देसाई यांनाही विचारण्यात आलं. परंतु, त्यांनी सुप्रिया सुळेंनी सांगितलेली माहिती फेटाळून लावली.

हेही वाचा >> “उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

शंभूराज देसाई म्हणाले, “सुप्रियाताईंना कोणी बातमी दिलीय हे माहिती नाही. आरएसएसची बातमी त्यांच्याकडे कशी जाते माहीत नाही. ही खोटी बातमी आहे. काहीतरी सांगयचं, बोलायचं म्हणून त्या बोलत आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जे. पी. नड्डा आरएसएसविषयी काय म्हणाले होते?

 “पक्षाची आता वाढ झाली आहे. प्रत्येकाला ज्याची त्याची कर्तव्य आणि भूमिका आहेत. आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. आम्ही राजकीय संघटना आहोत. इथे गरजेचा प्रश्न नाही. आरएसएस ही एक वैचारिक शाखा आहे. ते वैचारिक दृष्टीने आपलं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. आम्ही आमच्या पद्धतीने आमचं कामकाज पाहतो. हेच तर राजकीय पक्षांनी करायला हवं”.