वाई : साताऱ्यात उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज भरताना झालेली गर्दी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निश्चय सातारकरांनी केला आहे. त्यामुळे उदयनराजे भोसले प्रचंड मतांनी विजयी होतील. आजचा हा ट्रेलर तुम्ही बघितलेला आहे पिक्चर तुम्हाला मतदानादिवाशी बघायला मिळेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निश्चय सातारकरांनी केला आहे. त्यामुळेच इतकी प्रचंड गर्दी आज झाली आहे.उदयनराजे भोसले हे प्रचंड मतांनी निवडून येतील.शरद पवार खूप सभा घेत आहेत असे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले असता ते म्हणाले, सभा घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे चार आमदार असून दोन विधानसभा मतदारसंघात महायुतीची प्रचंड ताकतीची आहे. त्यामुळे उदयनराजे प्रचंड ताकतीने विजयी होतील. आजचे शक्ती प्रदर्शन हा ट्रेलर सर्वांनी बघितला आहे. आता पिक्चर मतदानादिवशी बघा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

आणखी वाचा-मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंनी भरला उमेदवारी अर्ज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यात महायुतीला खूप चांगले वातावरण असून एवढ्या मोठ्या तापमाना सुद्धा लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत आहेत त्यांच्यामध्ये महायुती प्रति विश्वास असल्याने लोक महायुतीला मत देत असल्याचे त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती उदयनराजे चांगल्या मतांनी निवडून येतील. भाजपच्या ४०० पारमध्ये उदयनराजे हे मोदींसोबत साताऱ्यातून असतील, असा विश्वास व्यक्त केला.