शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली होती. “शिंदे गटातील नेत्यांना हिंदूत्वाचे काहीही सोयरसुतक नसून त्यांना शिवसेना कार्यकर्त्यांची काळजी नाही.”, असे त्या म्हणाल्या होत्या. सुषमा अंधारेच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी दीड वर्षाच्या मुलाचा उल्लेख केल्याने श्रीकांत शिंदे दुखावले, हात जोडून केली विनंती, म्हणाले “बाळावर माया करणाऱ्या आईचा शाप…”

santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?
Death threat to Deputy Chief Minister devendra Fadnavis on social media case filed in Santacruz police station
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी, सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Ajit Pawar and rohit pawar
अजित पवारांना कुटुंबात एकटं पाडलं जातंय का?, रोहित पवार म्हणाले, “साहेबांनी बांधलेल्या घरातून…”
fm nirmala sitharaman directed regulators to take more stringent steps against fraudulent loan apps
फसव्या ‘लोन ॲप’वर अंकुश; अर्थमंत्री सीतारामन यांचे नियामकांना आणखी कठोर पावले टाकण्याचे निर्देश

काय म्हणाले शंभूराज देसाई?

“सुषमा अंधारे या एक महिन्यापूर्वी शिवसेनेत आल्या आणि उपनेत्या झाल्या आहेत. आता त्या आमच्यासारख्या निष्ठावान शिवसैनिकांना निष्ठा शिकवत असतील तर यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. उद्धव ठाकरेंबरोबर आता कोणीही राहिलेलं नाही. त्यामुळे आता जो पक्षात येईल, त्याला पद मिळते आहे, जो येईल त्याला थेट मातोश्रीवर प्रवेश मिळतो आहे”, असे प्रत्युत्तर शंभूराज देसाई यांनी दिले. “सुषमा अंधारे यांनी वाटेल तसा प्रचार करावा. मात्र, लोकांना जो योग्य वाटेल त्यांनाचा पाठिंबा मिळेल”, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – अडीच वर्षांचा फॉर्म्यूल्यावरून पुन्हा आरोप प्रत्यारोप, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शपथ घेताच भाजपाची टीका, केशव उपाध्ये म्हणाले…

दसरा मेळाव्यात अंधारेंनी केली होती टीका

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला लक्ष केले होते. “दिवंगत शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या पत्नी पोटनिवडणुकीस उभ्या राहिल्या असताना शिंदे गटाने त्यांना पाठिंबा देण्याऐवजी भाजपला जागा दिली. या नेत्यांना हिंदूत्वाचे काहीही सोयरसुतक नाही व शिवसेना कार्यकर्त्यांची काळजी नाही. स्वत: च्या लाभाखेरीज त्यांना काही दिसत नाही”, अशी टीका सुषमा अंधारे यांनी शिंदे गटावर केली होती.