व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटच्या स्टेटसवर मुघल बादशाह औरंगजेबाचा फोटो शेअर करून त्याचं उद्दात्तीकरण करणारा मजकूर शेअर करणाऱ्यांविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्हापुरातल्या हिंदुत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं आज (०७ जून) पाहायला मिळालं. असे स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत विविध संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानुसार आज कोल्हापुरातले सर्व व्यवहार ठप्प होते. तसेच अनेक संघटनांनी शिवाजी महाराज चौकात ठिय्या आंदोलनही केलं. काही ठिकाणी जमाव प्रक्षुब्ध झाल्याने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. या घटनेवर राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील याप्रकरणी आपली भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले, लोकांना दंगली नको आहेत. परंतु आम्ही हिंदू म्हणून असल्या घाणेरड्या गोष्टी खपवून घेणार नाही. आम्ही प्रसारमाध्यमांद्वारे नम्र इशारा देतोय की, असले प्रकार थांववा. या नम्र इशाऱ्यानंतर ऐकलं तर ठीक नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीने इशारे देता येतात. रस्त्यावर उतरायची वेळ आली तर आम्ही उतरू, त्यानंतर होईल ते होईल. महाराष्ट्र सरकारने त्यांचा बंदोबस्त करावा नाहीतर आम्ही त्यांचा बंदोबस्त करायला सक्षम आहोत.

हे ही वाचा >> हे ही वाचा >> “तरुणींच्या आईवडिलांची घुसमट…”, मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातल्या घटनेवरून अमित ठाकरेंचा संताप; म्हणाले…

देशपांडे यांनी कोल्हापुरातील घटनेवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ज्या लोकांचं औरंगजेबावर प्रेम आहे त्यांच्या पार्श्वभागावार लाथा घाालायला हव्यात. औरंगजेबाला जिथे पुरलं आहे (दफन केलं आहे), तिथे यांनाही पुरायला पाहिजे. त्याचबरोबर ज्या लोकांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवलं होतं त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करायला हवी. त्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज कसला करता. अशी अ‍ॅक्शन झाल्यावर त्यावर रिअ‍ॅक्शन येणारच. हिंदूंकडून अशी प्रतिक्रिया येणं सहाजिक आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandeep deshpande strong warning over kolhapur riots asc
First published on: 07-06-2023 at 21:00 IST