संगमनेर: तालुक्यात वाढत्या अनधिकृत मज्जिद-मदरशांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनास १५ दिवसांचा वेळ देत आहोत. पंधरा दिवसात कारवाई झाली नाही तर आम्हाला पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार, असा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला.

तालुक्याच्या पठार भागातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करावे, या मागणीसाठी घारगाव येथे हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. आमदार संग्राम जगताप, मारुती मेंगाळ, योगेश सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप या वेळी म्हणाले, की आरोपी कुठे आहे हे पोलिसांना माहीत असते. पोलिसांनी जर ठरवले तर त्यांना अटक करू शकतात. परंतु पोलीस काय करतात हे कळत नाही. २४ तासाच्या आत आरोपीला अटक केली नाही, तर यापेक्षा जास्त उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. हिरव्या जातीचे साप फणा काढणारे असतात. अशा फणा काढणाऱ्याला ठेचून मारला पाहिजे. इथून पुढे असे प्रकार घडू नये, यासाठी आदिवासी बांधवांनी आपल्या समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.

यावेळी आमदार खताळ म्हणाले, की संगमनेर तालुक्याच्या पठार भागात काही बांगलादेशी लोक मोठ्या प्रमाणात आले आहेत. त्यांची चौकशी करून पोलीस प्रशासनाने ओळखपत्रे तपासावीत. स्थानिक समाजाची सुरक्षा ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. हिंदूंवर अन्याय होत असेल तर आम्ही शांत बसणार नाही. दोषींवर कारवाई न झाल्यास आम्हाला पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करावे लागेल. जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी त्यांनी आम्हाला लोकप्रतिनिधी केले आहे. त्यामुळे जर कोणाला जास्त खूमखुमी असेल तर त्यांची खुमखुमी काढायला मी आणि देवा भाऊ पक्का आहे असेही ते म्हणाले.

पोलिस काय करतात?

आरोपी कुठे आहे हे पोलिसांना माहीत असते. पोलिसांनी जर ठरवले तर त्यांना अटक करू शकतात. परंतु पोलीस काय करतात हे कळत नाही. २४ तासाच्या आत आरोपीला अटक केली नाही, तर यापेक्षा जास्त उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. हिरव्या जातीचे साप फणा काढणारे असतात. अशा फणा काढणाऱ्याला ठेचून मारला पाहिजे. इथून पुढे असे प्रकार घडू नये, यासाठी आदिवासी बांधवांनी आपल्या समाजात जागरूकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी आवाहन केले.