सांगली : अश्‍लिल चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित केल्याप्रकरणी शिराळा पोलीस ठाण्यात भूषण ठाकरे या नावाच्या इन्स्ट्राग्रामविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक निरीक्षक अनिता मेणकर यांनी याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

हेही वाचा – सांगली : अनैतिक संबंधातून सोसायटीच्या माजी अध्यक्षाची भरदिवसा हत्त्या

हेही वाचा – “एकनाथ खडसेंनी त्यांचा पक्ष कोणता हे सांगावं”; गिरीश महाजनांचा खोचक सवाल, म्हणाले, “भाजपावर बोलण्याआधी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांच्या सायबर सेलच्या माध्यमातून समाज माध्यमावर प्रसारित केल्या जाणार्‍या संदेशावर लक्ष ठेवण्यात येते. समाज माध्यमावरील संदेशाची पडताळणी करत असताना शिराळा येथील एका भूषण ठाकरे या नावाच्या इन्स्ट्राग्राम खात्यावरून एका अल्पवयीन मुलाचे आणि प्रौढ महिलेचे अश्‍लिल कृत्य असलेली चित्रफीत ६ मे २०२१ रोजी प्रसारित करण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकरणी अहवाल प्राप्त होताच संबंधित समाज माध्यमावर अश्‍लिल चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.