खूनप्रकरणी जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या संशयित आरोपीने आज (रविवार) सकाळी संरक्षक भिंतीवरून उडी मारून पलायन केले. त्याला पकडण्यासाठी पोलीसांनी नाकाबंदी केली असून अद्याप आरोपी पोलीसांच्या हाती लागलेला नाही.

तासगावमध्ये जेसीबी चालक म्हणून काम करणारा सुनील राठोड (रा. येळगोड, जि. विजापूर) यांने पत्नी पार्वती हिच्या मदतीने जेसीबी मालक हरी पाटील (रा. मंगसुळी, ता. अथणी) यांचा ८ जून २०२१ रोजी खून करून मृतदेह विहीरीत टाकला होता. पोलीसांनी दोघा पतीपत्नींना अटक केली होती. न्यायालयीन आदेशानुसार संशयित जिल्हा कारागृहात बंदी होता.

आज सकाळी कारागृहाच्या पश्चिम बाजूला असणाऱ्या वैरण अड्ड्याकडील संरक्षक भिंतीवरुन उडी मारून त्यांने पोबारा केला. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात कारागृह प्रशासनाच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे.