सांगली : सांगली आकाशवाणी केंद्रातून नुकतेच निवृत्त झालेले प्रसिद्ध सतारवादक उस्ताद रफिक नदाफ यांचे रविवारी २७ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. ते आकाशवाणी सांगली केंद्रावर सतारवादक कलाकार म्हणून कार्यरत होते. ते मुळचे धारवाडचे होते .त्यांचे गुरु उस्ताद बालेखान यांच्या हाताखाली सतारवादक म्हणून कलानिपुण होताच आकाशवाणी सांगली केंद्रात संगीत विभागात सतारवादक पदावर रुजु झाले.

आकाशवाणी केंद्रातुन त्यांनी आपली सतारवादनाची कला सर्वदूर पोहचवली. राष्ट्रीय शास्त्रीय संगीत सभेच्या माध्यमातून अनेकवेळा सहभागी होत रविवासरीय संगीत सभा आणि शनिवारच्या शास्त्रीय संगीत सभा कार्यक्रमामध्ये सतारवादन सादर केले. रसिकजनांची वाहवा मिळवली. याबरोबरच अनेक दिग्गज सुगम संगीत कलाकारांना त्यांनी सुरेख साथ करत कार्यक्रमाचा दर्जा वाढवला. वालचंद महाविद्यालय आणि सांगली मिरज शहरात त्यांनी आपल्या शिष्यासमवेत राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी सतारवादनाचे सांघिक कार्यक्रम केले. तसेच दिल्ली येथील राजपथावर जाहीर कार्यक्रम सादर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकाशवाणी मुख्यालय यांचेकडून त्यांना नुकतीच सतारवादनात आकाशवाणी टाॅप ग्रेड आर्टिस्ट म्हणून मान्यता मिळाली होती. त्यांनी अनेक शिष्य घडवले आहेत. त्यांनी आकाशवाणी चाचणी परीक्षा पास होऊन शास्त्रीय सतारवादन कार्यक्रम सादर केले. त्यांचे दोन्ही सुपुत्र शफाअत व सज्जाद सतारवादन कलेत निपुण होत, आकाशवाणी तसेच जाहीर शास्त्रीय कार्यक्रमामध्ये वाहवा मिळवत त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे.