सांगली : पलूसमधील लक्ष्मी बझार या दुकानाला गुरुवारी पहाटे आग लागून संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीमुळे दुकानातील सुमारे ४० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पलूस शहरात आमणापूर रस्त्यावर उदय पवार यांचे लक्ष्मी बझार हे मोठे दुकान आहे. तळमजल्यावर दुकान आणि पहिल्या माळ्यावर दुकानाचे मालक पवार यांचे निवासस्थान आहे. आज पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास दुकानात आग लागल्याची बाब समोर आली. मात्र, पलूस नगरपालिकेकडे अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नसल्याने कुंडल येथील क्रांती साखर कारखाना आणि किर्लोस्करवाडीतील अग्निशमन यंत्रणाची आगशामक वाहन येईपर्यंत बराच अवधी गेला. यामुळे दुकानातील शीतपेटीसह विविध साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

हेही वाचा – सोलापूर : भाजपचे उमेदवार राम सातपुतेंविरोधात आचारसंहिता भंगाचा अहवाल पुन्हा नव्याने पाठविणार

हेही वाचा – सोलापूर : रुग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुकानात किराणा मालाबरोबरच स्टेशनरी, कटलरी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. आगीत सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून आगीचे कारण अस्पष्ट आहे. भरवस्तीत दुकान असले तरी या आगीची झळ मात्र अन्य कोणत्याही दुकानाला बसली नाही.