सांगली : ‘नशा छोडो, राष्ट्र जोडो’ हा संदेश देण्यासाठी सांगलीत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो मॅरेथॉन’मध्ये दीड हजाराहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेत मुलांमध्ये अभिनंदन सूर्यवंशी आणि मुलींमध्ये प्रणाली मंडले यांनी प्रथम क्रमांक पटकावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नमो रन मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

‘नशा छोडो, राष्ट्र जोडो- स्थ भारत, सशक्त भारत !’ हा संदेश देत तरुणाईला व्यसनमुक्त जीवनाकडे वळविणे आणि राष्ट्रप्रेम जागविणे हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश होता. स्पर्धकांनी उत्साह, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट दर्शन घडवत मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली.

स्पर्धेतील विजेते असे- मुलांमध्ये अभिनंदन दीपक सूर्यवंशी, आकारा बिरादार, इराप्पा बेळगी, वैभव पवार, साहिल किरण साबळे यांचे अनुक्रमे पाच क्रमांकांचे बक्षीस देण्यात आले. तर उत्तेजनार्थ सागर शर्मा, ऋषिकेश दादासो सरगर, तुकाराम विजय कुल्लाळकर, प्रतीक मारुती पाटील, श्रीधर कांबळे. मुलींमध्ये- प्रणाली नामदेव मंडले, तनुजा सचिन सोळांदूरकर, ऐश्वर्या दीपक धोत्रे, सुमित्रा रावसाहेब खंडागळे, आराध्या गणेश शिंदे आणि उत्तेजनार्थ : आराध्या अमृत राजमाने, शीतल आप्पा पांढरे, सुहाना इरफान शेख, मयुरी संतोष राणे, अरिफा उमर शेख.

सर्व विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ स्पर्धकांना शील्ड व प्रमाणपत्र, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज पवार, शरद देशमुख, सुनील भोसले, शैलेश पवार, विशाल पवार, शरद नलवडे, प्रीती काळे, श्रीधर जाधव, अनिकेत खिलारे, शुभम देसाई आदींसह युवा मंचचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.