सांगली : शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडीमध्ये झालेल्या आंदोलन प्रकरणी दाखल गुन्ह्यातून मनसे प्रमुख राज ठाकरे यांना मुक्त करण्याचा विनंती अर्ज न्यायालयाने नामंजूर केला. या खटल्याची पुढील सुनावणी सहा डिसेंबरला होणार आहे. जिल्ह्यातील शेडगेवाडी फाट्याजवळ मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. रेल्वे कर्मचारी भरतीमध्ये परप्रांतीय तरुणांऐवजी मराठी व स्थानिक तरुणांना संधी मिळावी यासाठी  २००८  मध्ये मनसेच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले होते. यावेळी शेंडगेवाडी येथे बंद पाळण्यात आला होता. बेकायदा जमाव गोळा केला, जबरदस्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले, म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह शिरीष पारकर, जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत यांच्या सहित १० कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्याची आज न्यायालयात सुनावणी होती.

परळीत राष्ट्रवादीच्या सरपंचानं केलं राज ठाकरेंचं स्वागत; ५० फूट फुलांच्या हाराची जोरदार चर्चा!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खटल्याच्या आज झालेल्या सुनावणीवेळी मनसे अध्यक्ष ठाकरे आणि पारकर यांच्यावतीने गुन्ह्यातून मुक्त करण्यासाठी विनंती अर्ज करण्यात आला. घटना घडली त्यावेळी अर्जदार उपस्थित नसल्याने गुन्ह्यातून मुक्त करण्याची विनंती न्यायालयात करण्यात आली. मात्र, सरकारी वकिलांनी सदरचा प्रकार चिथावणीमुळे घडल्याचा दावा करीत ठाकरे व पारकर यांना गुन्ह्यातून मुक्त करण्यास विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून ठाकरे यांचा विनंती अर्ज नामंजूर केला.