छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भारतीय जनता पार्टी, एआयएमआयएम, शिवसेना (ठाकरे गट) पक्षांचे नेते एकमेंकांवर आरोप करत आहेत. दरम्यान, याप्रकरणावरून संजय राऊतांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकास्र सोडलं आहे. तसेच राज्यात दंगलींचा रामनवमी पॅटर्न निर्माण केला जातो आहे, असा आरोपही त्यांनी केला. एपीबी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “आम्ही पुणे लोकसभेची पोटनिवडणूक लढवणार”, विजय वडेट्टीवारांच्या विधानानंतर अजित पवारांनी सुनावलं; म्हणाले, “काही माणुसकी…”

Guna Road Accident
कारच्या ब्रेकमध्ये बिअरची बॉटल अडकल्यामुळे भीषण अपघात; भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत
Firing at Sand Ghat Clan wars erupted from disputes over supremacy
यवतमाळ : रेती घाटावर गोळीबार; वर्चस्वाच्या वादातून टोळीयुद्ध भडकले

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

रामनवमीच्या निमित्ताने गेल्या दोन वर्षांत दंगलींचा पॅर्टन निर्माण केला जातो आहे. हा ‘रामनवमी पॅटर्न’ आहे. राज्यात अनेक ठिकाणी गुढीपाडव्यालाही शोभायात्रा निघाल्या. गुडीपाडव्यापासून हिंदूंचं नवीन वर्ष सुरू होतं. गुढीपाडव्याच्या शोभायात्रा मुस्लीम वस्तीतून निघाल्या होत्या. मात्र, तेव्हा दंगली झाल्या नाहीत. पण रामनवमीला जाणीवपूर्वक दंगली घडवल्या गेल्यात, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा – “म्हस्केंना एकच सांगतो…”, अजित पवारांवरील ‘त्या’ गौप्यस्फोटावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

संभाजीनगरचं नामांतर शांततेत झालं. महाविकास आघाडी सरकारने या नामांतराचा प्रस्ताव मंत्रीमंडळात मंजूर केला होता, तेव्हा कोणतीही दंगल झाली नाही. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला, तेव्हाही दंगली झाल्या नाहीत. अनेकांनी नामांतराला लोकशाही मार्गाने विरोधात केला, पण कुठंही दंगली घडवल्या नाहीत. मग अचानक रामनवमीलाच कशी दंगली झाल्यात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा – Maharashtra Breaking News Live : “बेरोजगार तरुणांच्या हाती दगड देऊन दंगल घडवली जातेय”, संजय राऊतांचा गंभीर आरोप, प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर…

राज्यातील संभाजीनगर, मालवण, जळगाव, तसेच गुजरात, पश्चिम बंगाल आणि कर्नाटकमध्येही दंगलीच्या घटना घडल्या. जम्मू काश्मीरमध्ये जेव्हा भारतीय सैनिकांवर दगडफेक करण्यात आली, तेव्हा सांगण्यात आलं की ते ते बरोजगार आहेत, त्यामुळे ते दगड मारत आहेत. हाच पॅटर्न आता आता महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये लागू केला जातो आहे. हे सर्व ठरवून चाललं आहे. २०२४ पर्यंत वातावरण खराब करण्याचं एक षडयंत्र आहे, असेही ते म्हणाले.