देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं विधान खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पदवीधर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार रणजित पाटील यांच्या प्रचार सभेदरम्यान केले होते. त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आले होता. विशेष म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: व्यासपीठावर उपस्थित होते. दरम्यान, नवनीत राणांच्या या विधानावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा – जगातील सर्वात लांब नदी क्रूझ ‘एमव्ही गंगा विलास’ प्रवासासाठी सज्ज; आज पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा

नेमकं काय म्हणाले संजय शिरसाट?

“राणा दाम्पत्य हे देवेंद्र फडणवीसांचे भक्त आहेत. एखाद्याचं भक्त असणं काही चुकीचं नाही. त्यामुळे त्यांना फडणवीस मुख्यमंत्री आहेत, हे वाटणं साहाजिक आहे. यामागे त्यांची भावना चांगली आहे. मी एकनाथ शिंदेंना मानतो, मग मी पण म्हणेल की एकनाथ शिंदे २५ वर्ष मुख्यमंत्री राहायला हवे. त्यामुळे नवनीत राणा यांनी त्यांचं मत व्यक्त केले आहे आणि यात काहीही चुकीचं नाही”, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे. तसेच राणा दाम्पत्याची इच्छा असेल तर फडणवीस मुख्यमंत्रीही होतीलही, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – उर्फी जावेद रुपाली चाकणकरांची भेट घेणार; चित्रा वाघ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याची शक्यता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवनीत राणा नेमकं काय म्हणाल्या होत्या?

अमरावतीत रणजित पाटील यांच्या प्रचारसभेत बोलताना, “देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनात आमच्यासाठी मुख्यमंत्री आहेत. तेच महाराष्ट्राचा विकास करू शकतात. गोवा, गुजरात ज्या ज्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचं पाऊल पडलं, तिथे आपण न्यायासाठी लढणारा व्यक्ती बघितला. त्यांच्या पाठिशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण उपमुख्यमंत्री आहात. पण ज्या प्रकारे तुमच्या कामाचा आवाका आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे आमच्या सगळ्यांची कामं करता ते पाहून आमच्या मनातील मुख्यमंत्री तुम्हीच आहात”, अशी नवनीत राणा यांनी दिली होती.