शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता काँग्रेसला गळती लागली असून अनेक नेत्यांची भाजपा किंवा त्यांच्या मित्रपक्षांत सहभागी होण्यासाठी रीघ लागलेली दिसत आहे. अनेक पिढ्यांपासून काँग्रेसचे विचार रुजलेले नेतेही भाजपा आणि भाजपाच्या सहकारी पक्षात प्रवेश करत आहेत. पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात मोठे राजकीय हादरे बसणार असून काँग्रेससह अन्य पक्षांतील अनेक नेते भाजपाबरोबर येणार असल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांनी केला आहे.

दरम्यान, कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी या राजकीय उलथापालथीवर भाष्य केलं आहे. बांगर यांनी काही वेळापूर्वी हिंगोली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अशोक चव्हाण यांची शिवसेना भाजपाप्रवेशाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. येत्या दोन तीन दिवसांत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्याबरोबर लातूरचे दिग्गज नेते, नांदेड, अमरावती आणि चंद्रपूरचे दिग्गज नेते शिवसेना आणि भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यापैकी एक नाव आज निश्चित झालं आहे. त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.

Heena Gavit Resigns from BJP
Heena Gavit : भाजपाला मोठा धक्का, हिना गावितांचा पक्षाला रामराम; अक्कलकुव्यात शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
amchi dena bank lena bank nahi cm Eknath Shinde criticized opposition on Monday
आमची देना बँक आहे, लेना बँक नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कल्याणमध्ये विरोधकांवर टीका
Sharad Ponkshe
Sharad Ponkshe : “मी शिंदे गटाचा उपनेता फक्त नावाला…”, मनसेच्या व्यासपीठावरून शरद पोंक्षेंची शिवसेनेवर अप्रत्यक्ष टीका
Akshay Kumar And Shreyas Talpade
“पहिल्या दिवसापासून त्याने मला…”, श्रेयस तळपदेने सांगितला अक्षय कुमारबरोबर काम करण्याचा किस्सा; म्हणाला…
chhagan bhujbal on manoj jarange decision to not contest maharashtra assembly election spb 94
मनोज जरांगेंची विधानसभा निवडणुकीतून माघार; छगन भुजबळ म्हणाले, “हा निर्णय म्हणजे…”
amol mitkari jitendra awhad
“मुंब्र्यात जाऊन जितेंद्र आव्हाडांना…”, मिटकरींचं आव्हान; अजित पवारांवरील टीकेनंतर संताप व्यक्त करत म्हणाले…
Sanjay Bhoir and Meenakshi Shinde have withdrawn their rebellion after cm s orders
बंडोबा थंडावताच संजय केळकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भेटीत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याचा केळकरांचा दावा

आमदार संतोष बांगर म्हणाले, येत्या आठ दिवसांत राज्याच्या राजकारणात एवढा मोठा स्फोट होईल की, मला तरी वाटतंय काँग्रेस अस्तित्वातच राहणार नाही. आमचे खासदार हेमंत पाटील पुन्हा एकदा २०२४ च्या निवडणुकीत हिंगोली लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवतील. तुम्ही पाहिलं असेल की शिवसेना-भाजपात सातत्याने इनकमिंग चालू आहे. तसेच तिकडे काँग्रेस, उबाठा, शरद पवार गटातून आऊटगोइंग चालू आहे. त्यांच्यावर कशी वेळ आली आहे बघा.

कळमनुरीचे आमदार म्हणाले, महाविकास आघाडीत जे लोक राहिलेत त्या सगळ्यांना, प्रामुख्याने तिकडच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की, त्यांनीदेखील इकडे या, २०२४ च्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत इमानेइतबारे काम करा. पुढच्या वेळी तुम्हाला जिल्हा परिषदेवर, पंचायत समिती आणि नगर परिषदांवर जाण्याची संधी देऊ.

हे ही वाचा >> “…म्हणून मी राजीनामा दिला”, अशोक चव्हाणांनी सांगितलं काँग्रेस सोडण्याचा निर्णय कधी आणि का घेतला?

काँग्रेसला गळती

भाजपाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघ जिंकण्यासाठी अन्य पक्षातील कोणत्या नेत्यांचा उपयोग होईल, यादृष्टीने नियोजन केलं आहे. संबंधित नेत्याने भाजपमध्ये प्रवेश करायचा की सहकारी पक्षात, याबाबतचे धोरणही बहुतांश प्रकरणांमध्ये भाजपाच ठरवीत आहे. काँग्रेसचे माजी खासदार मिलींद देवरा यांनी नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे वडील मुरली देवरा हे ज्येष्ठ काँग्रेस नेते होते आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्री होते. गांधी घराण्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. मिलींद देवरा यांचेही ज्येष्ठ नेते राहुल गांधींसह काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चांगले संबंध होते. पण राजकीय भवितव्याच्या दृष्टीने देवरा हे भाजपबरोबर सत्तेत असलेल्या शिंदे गटात सामील झाले. देवरा यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांनीदेखील नुकताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.