साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने काल रात्री (रविवार) आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात साताऱ्यातील तालीम संघाच्या मैदानावर तुफान गर्दी होऊन मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी झाल्याचे दिसून आले.या दहीहंडी कार्यक्रमासाठी पोलिसांनी भोंग्यासाठी परवानगी दिलेली असताना डॉल्बीचा सर्रास दणदणाट करण्यात आला. एवढंच नाहीतर उपस्थित तरुणांनी गर्दीमध्ये कोयते नाचवत नृत्य केल्याचेही समोर आल्याने, याबाबत पोलिसांनी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे.

खासदार उदयनराजे भोसले मित्र समूहाने काल(रविवार) आयोजित केलेल्या या दहीहंडीचे पारितोषिक एक लाख ७७ हजार ७७७ रुपये होते. ही दहीहंडी जवळवाडीच्या ( ता.जावळी) येथील भैरवनाथ गोविंदा पथकाने फोडून बक्षिसाची रक्कम पटकावली. यामध्ये सात गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी सगळय़ांच्या नजरा पाच थराची सलामी देवून सहाव्या थराला मटकी फोडणाऱ्या जवळवाडीकरांच्याकडे होत्या. कार्यक्रमास प्रचंड गर्दी होती, शिवाय खासदार उदयनराजे आल्यानंतर त्यांनी देखील आपल्यान नेहमीच्या स्टाईलने तरुणांचा उत्साह वाढवला. नंतर खासदार उदयनराजेंनीही दहीहंडी फोडत या कार्यक्रमाचा शुभारंभ केला.

यावेळी डॉल्बीचा सर्रास वापर सातरकरांचे लक्ष वेधून गेला. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात असताना डॉल्बी लावून मैदान चारही बाजूंनी बंद करण्यात आले होते. दहीहंडी कार्यक्रम पाहण्यासाठी सातारकरांनी आवर्जून हजेरी लावली होती. खासदार उदयनराजेंची एन्ट्री होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडले अन् डॉल्बीवर ‘आया है राजा बोलो रे बोलो’ हे गाणं लावलं होतं. त्यामुळे प्रत्येकजण बेभान होऊन नाचत होता. तर उदयनराजे व्यासपीठावरून तरूणाईच्या उत्साहाला दाद देत होते.

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करणार –

दरम्यान, तरुणाई बेफाम होऊन थिरकत असताना गर्दीतील तरुणांनी कोयता नाचवत नृत्य केल्याची गंभीर बाबा निदर्शनास आल्याने, याची दखल घेत सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी डॉल्बी लावल्याप्रकरणी नियमांचे उल्लंघन आणि कोर्टाच्या आदेश न पाळल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उदयनराजेंच्या उपस्थित साताऱ्यात जल्लोषात दहीहंडी उत्सव पार पडला.या दहीहंडी कार्यक्रमाला हजारो सातारकरांची उपस्थिती होती.उदयनराजेंच्या एन्ट्रीनंतर तरुणाईनं जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.