वाई: सातारा कास रस्त्यावर संगीताच्या तालावर उत्तान कपड्यात महिला  नाचवणाऱ्या व  पैसे उडविले जात असलेल्या  पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्टवर आज शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकत ग्राहकांसह हॉटेल मालक, मॅनेजर आणि वेटर्स अशा २१ जणांवर कारवाई करत ८२ हजार ६९८ रुपये रोख रक्कम, मोबाईल हँडसेट जप्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> “ड्रग माफिया ललित पाटील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत असतानाच…”; देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य

जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या  कास रस्त्यावर सातारा तालुका पोलिसांनी पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्टवर छापा टाकून ही कारवाई केली. संगीताच्या तालावर उत्तान कपड्यात सहा  महिला  नाचवणाऱ्या व  पैसे उडविले जात असलेल्या पेट्री येथील रिसॉर्टवर पोलिसांनी छापा टाकला. ग्राहकांसह हॉटेल मालक, मॅनेजर आणि वेटर्स अशा २१ जणांवर कारवाई करत ८२ हजार ६९८ रुपये रोख रक्कम, मोबाईल हँडसेट जप्त केले. पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल,उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली  सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी कारवाई केली. सातारा तालुका व शहर पोलीस ठाणे कर्मचाऱ्यांसह संबंधित ठिकाणी छापा टाकला. हॉटेलमधील हॉलमध्ये सहा बारबाला बीभत्स हावभाव करीत नृत्य करीत असल्याचे दिसून आले. याचबरोबर उपस्थित गिऱ्हाईक हे यांचा आनंद घेऊन त्या बारबालांवर नोटा उडवीत होते. त्या अनुषंगाने हॉलमध्ये बारबाला महिलांसोबत डान्स करीत असलेल्या १८ इसमांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले व त्यांच्या ताब्यामधील ८२ हजार ६९८ रुपये त्यामध्ये रोख रक्कम, मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले. तसेच हॉलमधील जी बी एस कंपनीची साऊंड सिस्टिम व डिस्को लाइट देखील जप्त करण्यात आले. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक, मॅनेजर आणि वेटर यांसह २१ जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दळवी करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Satara police raid on raj kaas hill resort at kas road zws
First published on: 28-10-2023 at 23:40 IST