सातारा : खंडाळा तालुक्यातील शिरवळ-लोणंद रस्त्यावरील भोळी येथील एसटी थांब्याजवळ कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत भोळी येथील चुलता-पुतण्याचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी दुपारी चारच्या सुमारास झाला. अमोल रघुनाथ चव्हाण (वय ४०) व धनंजय बबनराव चव्हाण (५६, दोघे, रा. भोळी, ता. खंडाळा), अशी मृत चुलता-पुतण्याची नावे आहेत.

भोळी येथील अमोल चव्हाण व धनंजय चव्हाण हे दोघे शिरवळ येथे नातेवाइकांच्या साखरपुडा कार्यक्रमासाठी दुचाकी (एमएच ११ सीएक्स ११६५) ने आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर हे दोघे शिरवळहून भोळीकडे परत येत असताना चारच्या सुमारास भोळी गावच्या हद्दीत असणाऱ्या एसटी थांब्याजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनर ने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अमोल चव्हाण यांना मृत घोषित केले, तर गंभीर जखमी धनंजय चव्हाण यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातानंतर टँकर चालकाने पलायन केले. याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. कंटेनर चालक गौरव विजय ढोरे (गड कुमली, ता. साकोरी, जि. भंडारा) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कीर्ती मस्के यांनी ही माहिती दिली, त्या अधिक तपास करत आहेत.