सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात ६ विद्यार्थी जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे मंगळवारी सकाळी हा अपघात घडला असून या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात बस चालकासह शिक्षण संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी आनंद सागर या शाळेची विद्यार्थी वाहतूक करणारी बस (एमएच १२ एफसी ९११३) नरसिंगाव येथे पलटी झाली. या अपघातामध्ये विभावरी पोतदार, विकास पोतदार, ऋग्वेद चव्हाण, सान्वी सगरे, समृद्धी माळी, अनन्या पवार हे सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कवठेमहांकाळमधील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

हेही वाचा : सायखेडा ग्रामपंचायतीने ठराव रद्द न केल्यास न्यायालयात धाव – प्रेमविवाहाची नोंद न करण्यास राईट टू लव्हचा आक्षेप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणी बस चालक तुषार माळी याच्यासह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.