अलिबाग – रायगड जिल्हयातील शाळा महाविद्यालये उद्या बुधवार (दि. 20) बंद राहणार आहेत. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांनी याबाबतचे परीपत्रक जारी केले आहे. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेवून रायगड जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हवामान खात्याने आज आणि रायगडसाठी पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अंबा, कुंडलिका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. सावित्री नदी ही इशारा पातळी वरून वाहत होती. हवामान विभागाकडून उद्या मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी, व्यवसाय प्रशिक्षण संस्था यांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना कामावर यावे लागणार आहे असे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या परीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.