संतापजनक! “शरीरातील काकाचं भूत काढतो” सांगत स्वयंघोषित बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

‘मुलीच्या शरीरात असलेल्या तिच्या मृत काकाच्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठीचा उपचार’ म्हणून हा धक्कादायक प्रकार करण्यात आल्याची माहिती आहे.

8 Year Old Girl Sexually Abused by Teacher Kalyan gst 97

ठाण्यातील भिवंडीमधील एका स्वयंघोषित बाबाने १६ वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. ‘मुलीच्या शरीरात असलेल्या तिच्या मृत काकाच्या आत्म्याला बाहेर काढण्यासाठीचा उपचार’ म्हणून हा धक्कादायक प्रकार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्याहून धक्कादायक म्हणजे या मुलीच्या आईनेच आरोपीला हा गुन्हा करण्यास मदत केल्याचा आरोप आहे. आता पोलिसांनी या मुलीची आई आणि स्वयंघोषित बाबा या दोघांनाही अटक केली आहे. या पीडित मुलीने नारपोली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर महिलेशी संबंधित आणखी एकाला देखील अटक करण्यात आली आहे, असं एका अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं.

तक्रारदार पीडित मुलीने पोलिसांना सांगितलेल्या माहितीनुसार, तिच्या मानेला तीव्र वेदना होत होत्या आणि त्यावेळी या आरोपीने (स्वयंघोषित बाबाने) असं सांगितलं की, तिच्या मृत काकाचं भूत तिच्या शरीरात आहे. त्याचप्रमाणे, ह्यातून बरं होण्यासाठी आपण या मुलीला मदत करू शकतो असा दावाही या बाबाने केला. हेच आमिष दाखवून तो बाबा पीडित मुलीला जंगलात घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे, यावेळी या मुलीला जंगलात घेऊन जाण्यासाठी तिची आई आणि तिच्या ओळखीचा युवक देखील होते.

भारतीय दंड संहिता, लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा आणि महाराष्ट्र मानवी बलिदान निर्मूलन आणि इतर अमानुष, वाईट आणि अघोरी प्रथा तसेच काळी जादू प्रतिबंध कायद्याच्या कलमांनुसार या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Self proclaimed baba rapes minor girl help of mother gst

ताज्या बातम्या