लोकसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात मोठा फटका बसला आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीच्या फक्त १८ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे सर्वाधिक खासदार संसदेत गेले आहेत. भाजपाचा हा पराभव स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी आज दिल्लीत अमित शाहांची भेट घेऊन चर्चा केली आहे. ते उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यास त्या जागी शंभूराज देसाई यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. यावर शंभूराज देसाईंनी स्पष्टीकरण दिलं आहे.

महाराष्ट्रातील भाजपाची पिछेहाट पाहता देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारी मुक्त करण्याची विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्यास उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदी शंभूराज देसाई यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आज दिवसभर यावर चर्चा सुरू होती. परंतु, या चर्चांवर आता शंभूराज देसाईंनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री पदाबाबतचे दावे फेटाळून लावले आहेत.

हेही वाचा >> विश्लेषण : देवेंद्र फडणवीस यांना सरकारमधून बाहेर का पडायचे आहे?

“मला उपमुख्यमंत्री पद मिळणार आहे, यात कोणतंही तथ्य नाही. ही बातमी निराधार आहे. कोअर कमिटीच्या मीटिंगमध्ये देवेंद्र फडणवीसांनी अपयश स्वीकारला. सरकारमधून बाहेर पडून तीन महिने महाराष्ट्र पिंजून काढतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. परंतु, बावनकुळे यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत खुलासाही केला. देवेंद्रजी संघटनेचंही काम करतील आणि पदावरही राहतील, असं आम्ही ठरवलं आहे. या मतावर सर्व ठाम आहोत. ते अमित शाहांना भेटले आहेत. त्यांच्यात काय चर्चा झाली माहिती नाही. आम्ही दिल्लीला जाणार आहोत, पक्षश्रेष्ठींना भेटून आमच्या भावना सांगणार आहोत. देवेंद्रजींना राजीनामा देण्याची गरज नाही. ते संघटनेतही राहू शकतात आणि सरकारमध्येही राहू शकतात”, असं म्हणत राजकीय चर्चांवर शंभूराज देसाई यांनी पूर्णविराम दिला आहे.

हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांचे पंख भाजपा पक्षश्रेष्ठींनी कापले नसते तर लोकसभा निवडणुकीतलं महाराष्ट्रातलं चित्र वेगळं असतं का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवेंद्र फडणवीस आक्रमक आणि अभ्यासू

देवेंद्र फडणवीस हे आक्रमक स्वभावाचे आणि तितकेच अभ्यासू नेते आहेत. विरोधात असताना किंवा मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांची भाषणं असतील किंवा धोरणी निर्णय असतील या सगळ्याची कायमच चर्चा झाली. शरद पवारांच्यानंतर पाच वर्षांचा कार्यकाळ सांभळणारा सर्वात तरुण मुख्यमंत्री अशी त्यांची ख्याती झाली होती. त्यानंतर २०१९ ते २०२४ या काळात म्हणजेच लोकसभा निवडणुकीपर्यंत त्यांच्या प्रतिमेवर तडे मारण्याचं काम पक्षातल्या वरिष्ठांकडूनच करण्यात आलं हे वारंवार झालेल्या घटनांनी दाखवून दिलं. मात्र या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणुकांवर झाला. नुसता झालाच नाही तर निकालांणध्ये तो लख्खपणे दिसला.