काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचा लवकरच महाविकास आघाडीत समावेश होईल, असे तर्क-वितर्क लावले जात होते. पण वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचीही चर्चा होती.

या चर्चेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी काळात वंबआ आणि मविआ यांच्यात युती होणार का? यावर भाष्य केलं आहे. याबाबत प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, “मला याबद्दल माहीत नाही. कारण मी त्या चर्चेत नसतो. निवडणुकीला सामोरं जाताना राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढावी, अशी आमची विचारधारा आहे.” शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचा- “…तर मी मानहानीचा दावा ठोकणार”, उद्धव ठाकरेंच्या सभेआधी रामदास कदमांचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या विधानाबाबत विचारलं असता प्रकाश आंबेडकर म्हणाले, “घोडा मैदान जवळ आहे. योग्य वेळी सर्व परिस्थिती समोर येईल. मात्र एक गोष्ट मी याठिकाणी सांगू इच्छितो की, शिवसेना आणि वंचितची युती आहे. उरलेल्यांच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही.”