वाई: छत्रपती शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकर या विचारांचे लोक जे धर्म निरपेक्ष आहेत ते सगळे एकत्र येवून  एक वेगळा इतिहास करु शकतात. राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण आहे. महाविकास आघाडीची चर्चा चांगली होत आहे. आमच्यात कुठल्याही प्रकारचे मतभेद  नाहीत. परंतु महायुतीत मतभेद आहेत, कोणतीही एकवाक्यता नाही.सातारा आणि माढा लोकसभा मतदार संघात मतदार महाविकास आघाडीच्याच उमेदवारालाच निवडून देतील असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत  होते. यावेळी  रमेश उबाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.साताऱ्यात भाजपा म्हणते आमचाच उमेदवार पाहिजे. शिवसेनेचा शिंदे गट  आणि राष्ट्रवादी सुद्धा म्हणतेय आमचाच  उमेदवार पाहिजे. आमच्याकडे तसे काही झालेले नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीत एकवाक्यता किती  हे त्यांचे त्यांनाच माहित असे सांगून शशिकांत शिंदे म्हणाले,महाविकास आघाडी एकत्रीतपणे  निवडणूकीला समोरे जाणार आहे. जनतेच्या मनात महायुतीबाबत प्रचंड नाराजी आहे. काहीही असो लोकशाही संपुष्टात येत आहे. त्या विरोधातली ही लढाई आम्ही एकत्रित लढत आहोत. ही लढाई सगळ्यांनी केली पाहिजे. पक्ष किंवा पक्षाच्या नेत्यांनी करण्यापेक्षा सामुदायिकपणाने केली पाहिजे. या लढाईतून क्रांती झाली तरच संविधान वाचेल.शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार वाचेल, तरच लोकशाही जीवंत राहिल. आज  सरकारमध्ये तीन पक्षांच्या सरकारमध्ये  अधिकाऱ्यांनी नक्की कोणाच ऐकायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे.

Heartfelt sorrow by Chhatrapati Shahu Maharaj, Rajavardhan Kadambande , Rajavardhan Kadambande calls himself Rajarshi Shahu s heir, Chhatrapati Shahu Maharaj give reply to Rajavardhan Kadambande, Kolhapur news, marathi news, rajashri shahu maharaj news, lok sabha 2024,
राजवर्धन कदमबांडे राजर्षी शाहूंचे वारसदार म्हणवतात याचे मनस्वी दु:ख; छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिउत्तर
lokmanas
लोकमानस: महाराष्ट्रधर्म राजकारणापुरताच मर्यादित नाही!
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा

हेही वाचा >>>सातारा:प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करावे-रामदास आठवले

 महाविकास आघाडीत वंचितचे प्रकाश आंबेडकर यांचा  सहभाग झालेला आहे.गवई गट येत आहे.याचाच अर्थ जे धर्म निरपेक्ष आहेत ते सगळे  एका विचारांचे लोक एकत्र येवून वेगळा इतिहास करु शकतात असे चांगले वातावरण राज्यात आहे. पोलीस ठाण्यात गोळीबार होत असेल तर  यांना कोणाची कसलीच भीतीच राहिली नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि सत्य काय आहे ते लोकांसमोर यायला हवे असे ते म्हणाले. आरक्षणाबाबत सरकार झुलवत ठेवत आहे.आता जो अद्यादेश काढलेला आहे. त्यात नवीन असे काहीच नाही. मनोज जरांगे पाटील यांची  मागणी होती. सगेसोयरे घ्या. त्यात पितृसत्ताक असे केले आहे. पितृसत्ताक हे पूर्वीपासूनच होते. नवीन काही नाही त्यामध्ये. मातृसत्ताक घ्यायला हवे होते.या सरकारमध्ये एकवाक्यता नाही. प्रत्येक जण आपल्या अधिकाराचा वापर करुन सरकार चालवत आहेत असेही आमदार शशिकांत शिंदे म्हणाले.