शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आपलेच असल्याचा दावा हे दोन्ही गट करतात. निवडणूक आयोग याबाबत काय निकाल देतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. असे असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बंडखोरी केलेल्यांना लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असं भाषण शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी केले होते, असे असा दावा आहे. राऊतांच्या याच दाव्यावर आता शीतल म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे, असे शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.
हेही वाचा >>> ‘मोदी, शाहांना तुरुंगात टाकू’ म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांवर चंद्रशेखर बावनकुळे संतापले; म्हणाले “तर राज्यात…”
मी फक्त एक माजी नगरसेवक आहे
“आज महाज्ञानी, महावक्ता संजय राऊत यांनी एक आकाशवाणी केली. मी शीतल म्हात्रे मागील १८ वर्षांपासून कट्टर शिवसैनिक आहे. संजय राऊत म्हणाले की माझ्या वक्तव्यामुळे ४० आमदार गुवाहाटीला गेले. हसावे की रडावे हेच मला समजत नाही. मी आमदार नाही किंवा खासदारही नाही. मी फक्त एक माजी नगरसेवक आहे. माझ्या बोलण्याला घाबरून आमदार पळून गेले, असे म्हणणे लहान मुलांनाही पटणारे नाही,” असे शीतल म्हात्रे म्हणाल्या.
लवकरच बरे व्हा. राऊत साहेब गेट वेल सून
“संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडलेले वाटत आहे. सकाळी काय बोलतात हे संध्याकाळी त्यांच्या लक्षात राहत नाही. त्यांच्यावर चांगले उपचार होणे गरजेचे आहे. लवकरच बरे व्हा. राऊत साहेब गेट वेल सून,” अशी कोपरखळी शितल म्हात्रे यांनी मारली.
हेही वाचा >>> MPSC New Syllabus Decision : मोठी बातमी! MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार, राज्य सरकारने घेतला निर्णय
संजय राऊत काय म्हणाले ?
बंड करून गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दंडुक्यांनी मारणम्याची भाषा आपण केलीच नव्हती, असं राऊतांनी आज माध्यमांना सांगितलं. “लाठ्या मारा किंवा त्यांना दंडुक्याने बडवून काढा असं भाषण मला वाटतं आज त्यांच्या गटात असणाऱ्या शीतल म्हात्रे यांनीच अलिबागच्या सभेत केलं होतं. त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे की नेमके ते का सोडून गेले? मी धमक्या दिल्यामुळे सोडून गेले की शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससह युती केल्यामुळे सोडून गेले की हिंदुत्वाच्या संदर्भात त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या म्हणून ते सोडून गेले. त्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे. ते प्रत्येक वेळा भूमिका बदलतात”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.