आगामी काळात बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानानंतर राजकीय पातळीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याविषयी विक्षिप्तपणाने वक्तव्य केले आहे. अशी वक्तव्ये केली जात असतील तर आम्हाला निषेध व्यक्त करावा लागेल, असे बावनकुळे म्हणाले आहेत. ते आज (३१ जानेवारी) नागपूरमध्ये बोलत होते.

हेही वाचा >> MPSC New Syllabus Decision : मोठी बातमी! MPSC चा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू होणार, राज्य सरकारने घेतला निर्णय

हे तर मानसिक दिवाळखोरीचे लक्षण

“वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत विक्षिप्तपणाने वक्तव्य केलेले आहे. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत जे बोलले ते मानसिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. आमच्या नेतृत्त्वावर टीका टिप्पणी केली तर राज्यभरात निषेध व्यक्त करावा लागेल. अशा वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो असंतोष निर्माण झाला आहे, त्याचा उद्रेक होईल,” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा >> “तर २०२४ च्या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी – अमित शहांना तुरुंगात टाकू”, प्रकाश आंबेडकर यांचे खळबळजनक वक्तव्य

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकाश आंबेडकर पुण्यातील खडकवासला येथे एका जाहीर सभेत बोलत होते. यावेळी बोलताना “देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. दुर्दैवाने या देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय, अशी परिस्थिती आहे. आगामी कालावधीत ही भीती आपल्याला दूर करायची आहे. आज या सभेच्या ठिकाणी एवढ्या प्रचंड संख्येने आपण जमलो आहोत. जर याचठिकाणी बीबीसीचा वृत्तपट आपण दाखवला असता तर सर्वांनाच पोलीस पकडू शकतील का? जर पकडले तरी एवढ्या लोकांना ठेवायला तुरुंगात जागा आहे का? झुकाने वाला चाहीये, सरकार झुकती है,” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.