धक्कादायक..! ठाण्यात शिवसैनिकावर शाखेत घुसून चाकूहल्ला

हल्लेखोरास शिवसैनिकांनी बेदम चोप दिला.

shiv sena division chief amit jaiswal stabbed in thane
शिवसेनेचे विभागप्रमुख अमित जयस्वाल

ठाण्याच्या श्रीरंग सोसायटी येथील शिवसेनेचे विभागप्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर बुधवारी रात्री शिवसेना शाखेत चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पूर्ववैमन्यस्यातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

ठाण्यातील श्रीरंग सोसायटी परिसरात अमित जयस्वाल राहतात. बुधवारी रात्री शिवसेनेच्या शाखेत बसलेले असताना एकजण त्यांना भेटण्यासाठी आला. अमित जयस्वाल यांच्यासोबत बोलत असताना अचानक त्याने अमित यांच्या चेहऱ्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर, हल्लेखोरास शिवसैनिकांनी बेदम चोप दिला.

हेही वाचा – बंगळुरु हादरलं! प्रियकराला मारहाण करुन विद्यार्थिनीवर केला सामूहिक बलात्कार

अमित जयस्वाल यांना उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती. ठाण्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी जयस्वाल यांची ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Shiv sena division chief amit jaiswal stabbed in thane adn