scorecardresearch

“आता नारायण राणेंना देशातला कायदा माहिती पडला असेल”; नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर शिवसेनेची प्रतिक्रिया

नितेश राणेंनी दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी पळून जाण्यापेक्षा पोलिसांना शरण जावे, असे विनायक राऊत म्हणाले.

Shiv Sena MP Vinayak Raut reaction after Nitesh Rane bail was rejected

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणातील संशयित असलेल्या भाजपा आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. नितेश राणेंचा नियमित जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. सोमवारी युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय़ राखून ठेवला होता. त्यानुसार मंगळवारी कोर्टाने निर्णय दिला असून जामीन नाकारला आहे. मात्र यावेळी कोर्टाबाहेर नितेश राणेंची गाडी अडवण्यावरुन निलेश राणे आणि पोलिसांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“पोलिसांबरोबर हुज्जत घालण्यापेक्षा अशा प्रकारचे काम केले नसते तर बरे झाले असते. कायद्याचे रक्षण करण्याचे काम पोलिसांचे आहे. कायद्याला अनुसरुन जे आहे ते पोलीस करत आहेत. त्यामुळे नितेश राणेंनी दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणी पळून जाण्यापेक्षा पोलिसांना शरण जावे आणि कायद्यानुसार जे आहे ते भोगावे,” अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी टीव्ही९ मराठी सोबत बोलताना दिली आहे.

“महाराष्ट्राची सर्वात मोठी समस्या राज्यपाल आहेत”; शिवसेना खासदाराची टीका

“निलेश राणेंचे नाटक नेहमीचेच असते मला त्यावर काही बालायचे नाही. पोलीस योग्य भूमिका घेऊन जे करणे आवश्यक आहे ते करतील. आत्ता खऱ्या अर्थाने नारायण राणेंना माहिती पडलं देशातला कायदा नेमका काय आहे तो. यापूर्वी नारायण राणेंच्या कारकिर्दीमध्ये मारा, ठोका आणि पळून जा अशा पद्धतीने सुरु होते. यामुळे कायद्याचे हात किती लांब पर्यंत जावू शकतो हे आता सिद्ध झाले आहे,” असे विनायक राऊत म्हणाले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आमदार नितेश राणे यांनी जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली होती. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर संतोष परब यांच्यासाठी अ‍ॅड प्रदीप घरत तर आमदार राणे यांच्यासाठी अ‍ॅड सतीश मानशिंदे यांनी सोमवारी युक्तिवाद केला. त्यानंतर कोर्टाकडून निर्णय राखून ठेवण्यात आला होता. सुनावणीदरम्यान कोर्टाने जामीन नाकारला असून यानंतर नितेश राणेंनी पुन्हा हायकोर्टात धाव घेतली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena mp vinayak raut reaction after nitesh rane bail was rejected abn

ताज्या बातम्या