या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगराध्यक्षपदी स्नेहा पाटील यांची वर्णी

मुरुड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी शिवसेनेच्या बाजूने कौल दिला.  १५ जागांपकी ९ जागांवर सेनेचे उमेदवार विजयी झाले. तर नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सेनेच्या स्न्ोहा पाटील ४०९ मतांनी विजयी झाल्या.

सलग १५ वर्षे असलेले राष्ट्रवादीचे मुरुड -जंजिरा संस्थान सेनेने खालसा केले. निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी खूप मेहनत घेतली. मात्र पक्षांतर्गत बंडखोरीमुळे राष्ट्रवादीवर सत्ता गमावण्याची वेळ आली.

राष्ट्रवादीने शेकाप आणि काँग्रेससोबत आघाडी करून शिवसेनेला तगडे आव्हान दिले होते. तर शिवसेना, भाजप स्वबळावर लढत होते. रविवारी नगराध्यक्षपदासह १५ नगरसेवकपदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तर सोमवारी मतमोजणी पार पडली.

त्यामध्ये जनमत शिवसेनेला मिळाले. नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत सेनेच्या स्न्ोहा किशोर पाटील यांना सर्वाधिक ३ हजार ५५५ मते मिळाली.

तर राष्ट्रवादीच्या मुग्धा दांडेकर याना ३ हजार १४६ मते मिळाली.  त्यामुळे ४०९ मतांनी स्न्ोहा पाटील यांना विजयी घोषीत करण्यात आले. थेट नगराध्यक्ष निवडणुकीत माजी नगराध्यक्ष रहीम कबले यांच्या पत्नी खवला कबले यांना ७५८ मते मिळाल्याने आघाडीच्या उमेदवार मुग्धा दांडेकर यांना पराभव पत्करावा लागला. तर भाजपच्या उमेदवार प्रीती बकर याना २४३ मते मिळाली.

राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, व काँग्रेस यांनी पक्ष मिळून ही निवडणूक लढवत होते. तीन पक्ष एकत्र असताना सुद्धा नगरपरिषद निवडणुकीत पाहिजे तसे यश मिळू शकले नाही. शिवसेना ९ जागांवर विजयी झाली.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दोन जागांवर विजयी झाले. शेकापला १ तर काँग्रेस २ जागांवर समाधान मानावे लागले. सेनेच्या विजयात माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, संदिप घरत आणि प्रचार प्रमुख संदीप पाटील यांनी महत्त्वाची भुमिका बजावली.

प्रभाग १ (अ ) मध्ये शिवसेनेच्या उमेदवार युगा ठाकूर .प्रभाग १ (ब ) मधून शिवसेनेचे प्रमोद भायदे, प्रभाग २ अ मधून शिवसेनेच्या अनुजा दांडेकर, २ ब मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर प्रभाग ३ अ मधून काँग्रेसचे विश्वास चव्हाण प्रभाग ३ ब मधून शिवसेनेच्या उमेदवार नौशीन दरोगे, प्रभाग ४ अ मधून राष्ट्रवादीचे अविनाश दांडेकर. प्रभाग ४ ब मधून राष्ट्रवादीच्या रिहाना शहाबंदर, प्रभाग ५ अ मधून शेकापचे आशिष दिवेकर ५ ब मधून काँग्रेसच्याआरती गुरव प्रभाग ६ अ मधून सेनेच्या मुग्धा जोशी प्रभाग ६ ब मधून शिवसेनेचे  अशोक धुमाळ, प्रभाग ७ ब  मधून शिवसेनेचे विजय पाटील प्रभाग ८ ब मधून शिवसेनेच्या वंदना खोत, ८ क मधून शिवसेनेच्या मेघाली पाटील या विजयी झाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena win murud janjira nagar parishad
First published on: 30-11-2016 at 01:49 IST