पुण्यात नुकतीच ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. यावर्षी पुण्याच्या राजगुरूनगर येथील शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला चीतपट करून महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली आहे. माझ्या आई, वडिलांच्या कष्टाच चीज झाले आहे. महाराष्ट्र केसरी जिंकण्यामागे आई, वडिलांचे पाठबळ आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकण्याचे श्रेय शिवराजने त्याच्या आई वडिलांना दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- तांबे पिता-पुत्राच्या बंडानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण? नाना पटोले म्हणाले, “बेईमानी करून…”

शिवराज हा शेतकरी कुटुंबातील आहे. गेल्या १४ वर्षांपासून तो कोल्हापूरला कुस्तीचे धडे घेतो आहे. १४ वर्षांचा तप आज पूर्ण झाला आहे. अशी प्रतिक्रिया शिवराजची आई सुरेखा यांनी लोकसत्ता ऑनलाइन दिली आहे. राज्यसरकार ने त्याला शासकीय नोकरी द्यावी अशी इच्छा त्याचे वडील काळूराम राक्षे यांनी व्यक्त केली. पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे शिवराज चे गावकऱ्यांनी स्वागत केले. 

हेही वाचा- ‘त्या’ विधानाची फडणवीसांना आठवण करून देणार; नारायण राणे यांचे वक्तव्य

पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शिवराज राक्षेने आपले नाव कोरले आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा मला काही वर्षांपासून हुलकावणी देत होती. अनेकदा मला दुखापत झाली. यातून न खचता यशाला गवसणी घातली आहे. माझ्या आई वडिलांच्या कष्टाच चीज झाले असून स्पर्धा जिंकण्याचे श्रेय मी माझ्या आई वडिलांना आणि गुरूला देतो अस महाराष्ट्र केसरी विजेता शिवराज राक्षेने सांगितले आहे. ही स्पर्धा जिंकल्यानंतर मला खूप आनंद झाला आहे. आज मला अभिमान वाटतो आहे की मी स्पर्धा जिंकलो आहे. मला आता राज्यशासनाकडून शासकीय नोकरीची अपेक्षा आहे. त्यांनी मला नोकरी द्यावी अस शिवराज म्हणाला आहे. 

हेही वाचा- जी २० परिषदेच्या लोगोतील कमळाबाबत नारायण राणे यांचे स्पष्टीकरण; म्हणाले, “ते कमळ म्हणजे…”

शिवराज ची आई सुरेखा राक्षे म्हणाल्या की, माझा १४ वर्षांचा तप पूर्ण झाला आहे. गेली अनेक वर्षे झाले आम्ही त्याच्यासाठी मेहनत घेत होतो. आज त्याने आमची मान अभिमानाने उंचावली आहे. शेती आणि दुग्धव्यवसायामुळे त्याचा खर्च उचलू शकलो. त्याला इथपर्यंत आणू शकलो. अस त्यांनी आवर्जून सांगितले आहे. शिवराज हा ऑलम्पिकची देखील तयारी करत असून त्याला राज्यशासनाने मदत करावी अस आवाहन वडील काळूराम राक्षे यांनी केलं आहे. शिवराज हा महाराष्ट्राचे कुस्तीतील उज्वल भविष्य आहे. त्याच्याकडे राज्यशासनाने लक्ष देणे नक्कीच गरजेचे आहे. 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivraj has credited his parents for winning the maharashtra kesari competition kjp dpj
First published on: 16-01-2023 at 13:59 IST