पुण्यात जी-२० परिषदेचे उदघाटन केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. जी २० परिषदेच्या लोगोवर भाजपाचे चिन्ह कमळचा फोटो आहे. ते कमळ भाजपाचे आहे की, भारताचे आहे. यावरून विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. यावर नारायण राणे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जी २० परिषदेच्या लोगोवरील कमळ भारताचे कमळ असून त्या कमळला एक अर्थ आहे. हे कमळ भाजपाचे म्हणून घेतले तरी माझी काही हरकत नाही. शाश्वत विकास म्हणजे कमळ. जो भाजपात येईल. तो स्वतः चा पण विकास करेल आणि आपला देखील विकास करेल, असेही राणे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ‘त्या’ विधानाची फडणवीसांना आठवण करून देणार; नारायण राणे यांचे वक्तव्य

सरकार बदल्यानंतर दृष्टीकोन बदलतो

राज्य सरकार बदल की,धोरणामध्ये बदल होतो.आजवर घडत आल आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उद्योग बाहेर गेले आहेत.त्या प्रश्नावर नारायण राणे म्हणाले की,सरकार बदल की,सरकारने घेतलेले निर्णय बदलतात. मी या मताशी सहमत नाही.राज्यात ३५ वर्षाच्या राजकीय प्रवासात अनेक मंत्रिपद भूषविली आहेत. एखादा निर्णय राज्याला, जनतेला भविष्याच्या दृष्टीने पोषाख नसेल तर तो निर्णय अपवादात्मक बदलला जातो. मात्र, त्यांनी घेतलेला सहसा बदलला जात नाही.पण सरकार बदल्यानंतर दृष्टीकोन बदलतो, अशी असेही राणे म्हणाले.

हेही वाचा- ‘छत्रपती संभाजी महाराजांबद्दल राजकारण्यांनी घातलेला वाद चुकीचा’; मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. गो. बं. देगलूरकर यांचे मत

तसेच ते पुढे म्हणाले की, आपल्या राज्यातील उद्योग बाहेर जात नाही.हे राजकारण असून हे वास्तव नाही.तसेच चुकीची माहिती समोर आणली जात आहे. आपल्या राज्यातील जेवढे उद्योग गेले असतील.पण तेवढ्याच क्षमतेने उद्योग आले देखील आहेत.हा एक इतिहास आहे.देशातील अनेक राज्यात उद्योजकांना चांगल्या सवलती दिल्यानंतर उद्योग येतात.पण आपल्याकडे चांगल्या पायाभूत सुविधा दिल्याने जमीन महाग असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा- पुणे : दोन प्रियकरांकडून महिलेचा गळा आवळून खून, तंबाखू माव्याच्या पुडीवरून आरोपी गजाआड

मी नेहमी गोडच बोलतो

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जी 20 परिषदे बाबत माहिती दिल्यावर, प्रसार माध्यमांच्या एका प्रतिनिधीने प्रश्न विचारण्या पूर्वी मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला अशा शुभेछा देताच नारायण राणे म्हणाले, मी नेहमीच गोड बोलतो.असे म्हणताच उपस्थितामध्ये एकच हशा पिकला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opponents are aggressive over the lotus photo on the logo of the g 20 conference svk 88 dpj
First published on: 16-01-2023 at 12:45 IST