राज्यात शिवसेना फुटलेली असताना उद्धव ठाकरेंचा साताऱ्याचा सेनापती कोण अशी चर्चा अस्ताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सूत्रे शेखर गोरे यांच्याकडे देण्याची मागणी शिवसैनिकातून होत आहे. साताऱ्यात शिवसेनेला आक्रमक नेतृत्वाची गरज आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी शिंदे गटात गेले मात्र शिवसैनिक उद्धव ठाकरेंबरोबर कायम राहिले आहेत.

हेही वाचा- ‘भारत जोडो यात्रा काँग्रेस नेत्यांच्या मुलांना लॉंन्च करण्यासाठी?’ बावनकुळेंच्या टीकेला नाना पटोलेंचे प्रत्युत्तर म्हणाले, “चिडखोर…”

शिवसेनेला जिल्ह्यात उभारी देण्यासाठी व शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी शेखर गोरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जिल्हयात वरिष्ठ पदाधिकारी म्हणून नेमणूक करण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे.महाराष्ट्रात शिंदे गटाने बंड केले तेव्हा उद्धव ठाकरेंना मानणारे सातारा जिल्ह्यातील प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांसह गायब झाले. साताऱ्यातील शिवसेना कार्यालयाला कुलूप लागले. परंतु शिवसेनेचे शेखर गोरे स्थानिक शिवसैनिकांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले.

हेही वाचा- “पवारांच्या घरातच उभी फूट…”, गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा; म्हणाले…

शेखर गोरेंबरोबर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मोठी फौज असताना त्यांना डावलले जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. सातारा जिल्हा बँकेत शेखर गोरे आपल्या आक्रमक कार्यशैलींने बँकेच्या निवडणुकीत यशस्वी झाले. व माण तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही शेखर गोरे यांनी आपला करिष्मा दाखवून दिला आहे. शेखर गोरे यांनी मागील विधानसभा व विधानपरिषद निवडणूक शिवसेनेचे उमेदवार म्हणून लढविली होती. थोड्या मतांनी ते पराभूत झाले. सातारा जिल्हा बँक संचालक पदाची निवडणूकही त्यांनी आपल्या आक्रमक भूमिकेवर जिंकली.

हेही वाचा- “…तर ते शकुनीमामाची औलाद” जितेंद्र आव्हाडांचं नरेश म्हस्केंवर टीकास्र!

शिवसेनेचे नेते असणाऱ्या नितीन बानुगडे पाटलांकडे संघटनात्मक बांधणीचा अनुभव नाही व कार्यकर्त्यांची फळी नाही. त्यामुळे पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी शेखर गोरे यांच्यासारख्या आक्रमक शिवसैनिकाकडे सूत्रे असावीत अशी अपेक्षा शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. काही तालुक्यात कट्टर शिवसैनिक असून त्यांना अपेक्षित ताकद मिळत नाही साताऱ्याला कट्टर शिवसैनिकांची परंपरा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातील असले तरी शिवसेना ठाकरे गटाचा जनाधार मोठा आहे. त्यामुळे शिवसेना फुटलेली असताना साताऱ्यात उद्धव ठाकरेंचा सेनापती कोण असा प्रश्न शिवसैनिकच विचारत आहेत.