महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा वाद दिवसेंदिवस गुंतागुंतीचा बनत चालला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगानं शिंदे गटाच्या बाजुने दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी पार पडली. आज सर्वोच्च न्यायालयात ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय आणि शिंदे गटाकडून जारी करण्यात येणारा संभाव्य व्हीप यावर दोन्ही गटाच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला.

यावर शिंदे गटाच्या वकिलांनी आम्ही व्हीप जारी करणार नाही, असं सर्वोच्च न्यायलयात न्यायालयात सांगितलं. दुसरीकडे, निवडणूक आयोगाच्या निकालावर स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. आजच्या सुनावणीनंतर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Nagpur Bench of Bombay High Court, Dismisses PIL, Alleging Illegal Killing Tigress, Tigress Avani, tigeress avani Illegal Killing , supreme court, public interest litigation, marathi news, animal rights,
अवनी वाघीण मृत्यूप्रकरण : उच्च न्यायालय म्हणाले, ‘पुन्हा युक्तिवाद…’
“आम्ही तुमची माफी स्वीकारणार नाही, कारवाईला सामोरे जा”; बाबा रामदेव यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
Delhi Chief Minister Arvind Kejriwal
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना धक्का; अटकेला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

“सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला कुठेही स्थगिती दिली नाही. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे गट व्हीप लावून ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली. तसेच संपत्ती व बँक खात्यातील निधीचा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतरही सर्वोच्च न्यायालयाने आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिला. न्यायालयाने आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत दिली आहे,” अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

“पुढील दोन आठवड्यात शिंदे गटाने व्हीप जारी केला, तर ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरू शकतात, अशी शक्यता कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली. यावर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आणि नीरज कौल यांनी न्यायालयाला सांगितलं की, सध्या तरी आम्ही व्हीप लागू करण्याच्या कोणत्याही विचारात नाही, याबाबतचं तोंडी आश्वासन आमच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाला दिलं आहे,” असंही राहुल शेवाळे म्हणाले.

“व्हीप जारी करण्याची प्रक्रिया अजून सुरू झाली नाही. हा पक्षांतर्गत प्रक्रियेचा विषय आहे. या प्रक्रियेचा कुणी अवलंब केला नाही, तर निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कारवाई होऊ शकते. पक्षांतर्गत निर्णयाबाबत निवडणूक आयोगाने जो निकाल दिला आहे. त्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. त्यावर आम्ही काहीही हस्तक्षेप करणार नाही, असं न्यायालयाने सांगितलं आहे,” अशी प्रतिक्रिया राहुल शेवाळेंनी दिली.