गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची शक्यता आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तीकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची चर्चा सुरु आहे. आपल्या राज्यात पुन्हा जाण्याची इच्छा आहे, असे कोश्यारींनी म्हटलं आहे. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली! ग्रेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमाना विरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूंशी लढाई सुरूच राहील! राजभवनाची खिंड पडली. आवाज शिवसेनेचाच! जय महाराष्ट्र!,” असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

हेही वाचा : इतिहासाच्या विद्रुपीकरणावर बोलताना जितेंद्र आव्हाडांचे राज ठाकरेंवर टीकास्त्र! म्हणाले “काल जे बोलले, त्यावर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अरविंद सावंत यांनीही भाष्य केलं आहे. “महाराष्ट्र याचं जोरदार स्वागत करेल. महाराष्ट्राची अस्मिता आणि अभिमानाचा अवमान करणारी माणसे राज्यपाल पदाची प्रतिष्ठा मलिन करत आहेत. यापूर्वीच राज्यपालांचा राजीनामा अथवा त्यांना हटवलं पाहिजे होतं. राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त करणे, ही भाजपाची क्लृप्ती आहे. पण, राज्यपालांना मुक्त करून महाराष्ट्र तणाव मुक्त करा. यापुढे कोणी हिंमत करता कामा नये,” असे अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे.